…तर भारताच्या ‘चक्रव्युहातून’ बाहेर पडणं कठीण; सीमेवरील डावपेच चीनला महागात पडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 12:33 PM2020-05-27T12:33:16+5:302020-05-27T12:35:15+5:30
लडाख ते अरुणाचल पर्यंतच्या ३ हजार ४८८ किलोमीटर लांबीच्या लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल (एलएसी) वादग्रस्त भागात रस्ते आणि हवाई संपर्क करण्याच्या दृष्टीने चीनच्या वर्चस्वाला भारत आव्हान देत आहे.
नवी दिल्ली – कोरोनाबाबत माहिती लपवल्याच्या आरोपाखाली अडकलेल्या चीननेभारताविरुद्ध दबाव आणण्याचे डावपेच रचत आहे. परंतु डब्ल्यूएचओपासून इतर अनेक मार्गातून भारतानेचीनसाठी असे चक्रव्यूह तयार केले आहे ज्यावर मात करणे चीनसाठी कठीण आहे. लडाख सीमेवर भारताने पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात मजबूत केल्याने चीनला दणका बसला आहे.
लडाख ते अरुणाचल पर्यंतच्या ३ हजार ४८८ किलोमीटर लांबीच्या लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल (एलएसी) वादग्रस्त भागात रस्ते आणि हवाई संपर्क करण्याच्या दृष्टीने चीनच्या वर्चस्वाला भारत आव्हान देत आहे. एकीकडे जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) च्या कार्यकारी मंडळाची धुरा भारताच्या हातात आली आहे. कोरोना विषाणूचा उद्भव चीनच्या वुहानमध्ये झाला. असे अनेक अहवाल आहेत की, चीनने सुरुवातीला व्हायरसची प्रकरणे लपविली. हळूहळू कोरोना सर्वत्र पसरला आणि आज याच परिस्थितीने ३ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.
जगातील अनेक देशांनी कोरोना व्हायरससाठी चीनला उत्तरदायित्व निश्चित करण्याची मागणी केली. आता चीन जगातील अन्य देशांच्या जाळ्यात अडकत आहे. त्याचबरोबर चीनचा बचाव करणाऱ्या डब्ल्यूएचओच्या भूमिकेबाबतही निर्णय घेण्यात येईल. भारतासह जगातील ६२ देशांनी कोरोनावरील स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. चीनविरुद्ध डब्ल्यूएचओची चौकशी सुरू झाल्यास अनेक लपवलेली तथ्ये समोर येतील.
तैवानचे राष्ट्रपती साइ इंग वेन यांच्या शपथविधी सोहळ्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाजपाच्या दोन खासदारांच्या सहभागाने चीनला मिरची झोंबली. चीनने भारताला त्यांच्या 'अंतर्गत' कामात हस्तक्षेप करण्याचे टाळण्यास सांगितले आहे. तैवानच्या राष्ट्रपतींनी बुधवारी शपथ घेतली. दिल्लीतील भाजपा खासदार मीनाक्षी लेखी आणि राजस्थानमधील चुरूचे खासदार राहुल कासवान यांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून यात भाग घेतला होता. या कार्यक्रमात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ हेदेखील उपस्थित होते. तैवानच्या स्वातंत्र्याचे समर्थक साइ इंग-वेन यांनी नुकतीच दुसऱ्यांदा राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. तैवानलाही अमेरिकेचा पाठिंबा आहे. अशा परिस्थितीत भारत येथेही चीनविरूद्ध चक्रव्यूह करू शकतो.
दक्षिण चीन समुद्रात तेल उत्खननाबाबत चीन आणि मलेशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षादरम्यान अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासह चीनची युद्धनौका पोहचली आहे. दक्षिण चीन समुद्रातून जाणाऱ्या प्रवासात सागरी कनेक्टिव्हिटी इंडो-पॅसिफिक प्रदेशाच्या शांतता, स्थिरता, समृद्धी आणि विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे असा भारताचा विश्वास आहे. सध्याच्या परिस्थितीत जरी भारत आपला दृष्टीकोन बदलत नसेल, परंतु चीन जर आणखी हिंमत करेल तर भारताची वृत्तीही बदलू शकते.
जगातील सर्वात पसंतीचं उत्पादन केंद्र म्हणून चीनची ओळख मिटण्याच्या मार्गावर आहे. कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे उद्भवणाऱ्या अडचणींमध्ये सुमारे १ हजार विदेशी कंपन्या भारतात कारखाने सुरू करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करीत आहेत. यापैकी किमान ३०० कंपन्या मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, वैद्यकीय उपकरणे, वस्त्रोद्योग आणि कृत्रिम वस्त्र क्षेत्रात भारतात कारखाने सुरू करण्यासाठी सरकारशी सक्रिय संपर्क साधत आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
चीनविरुद्ध भारताचं ‘पंच’तंत्र सज्ज; लडाख सीमेवर ड्रगनला चोख उत्तर देण्यास लष्कराची तयारी
बोटांच्या लांबीने कळेल तुम्हाला कोरोनामुळे मृत्यूचा धोका किती?; वैज्ञानिकांनी सांगितलं...
कोरोनाशी लढण्यासाठी वैज्ञानिकांचा नवा शोध; ‘या’ औषधाचा एक डोस रुग्णांना देणार ताकद!
रेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार; ३० तासांच्या प्रवासाला लागले तब्बल ४ दिवस, मजूर हैराण
हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा; दुपारी १ ते ५ दरम्यान घराबाहेर पडणं टाळा अन्यथा...