पाकिस्तानला अणूभट्टी देऊन चीनने केले नियमाचे उल्लंघन
By admin | Published: August 1, 2016 10:05 AM2016-08-01T10:05:38+5:302016-08-01T10:16:43+5:30
पाकिस्तानला अणूभट्टया देऊन चीनने अणवस्त्रप्रसार बंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - पाकिस्तानला अणूभट्टया देऊन चीनने अणवस्त्रप्रसार बंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. चीनने असे करुन अणवस्त्र तंत्रज्ञान पुरवठयासंबंधी अणवस्त्र प्रसारबंदी परिषदेत २०१० मध्ये एकमताने ठरलेल्या नियमाचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय अणूऊर्जा संस्थेच्या (IAEA) दिशा-निर्देशांनुसार काम करत नाही.
आयएईएने अणवस्त्र प्रसारबंदीच्या प्रगतीचा आढावा घेताना तयार केलेल्या अहवालात चीनबद्दल हे निरीक्षण नोंदवले आहे. भारताने अणवस्त्र प्रसारबंदीवर स्वाक्षरी न केल्याचा मुद्दा उपस्थित करुन चीनने भारताचा अणवस्त्र पुरवठादार देशांच्या गटात प्रवेशाचा मार्ग रोखला होता.
भारताच्या प्रवेशामुळे अणवस्त्र प्रसारबंदीचा उद्देश कमकुवत होईल असा चीनने त्यावेळी दावा केला होता. त्याच चीनने पाकिस्तानला अणूभट्टया देताना नियमांचे उल्लंघन केले आहे. चीनने २०१३ मध्ये पाकिस्तानला चष्मा ३ रिअॅक्टर देण्याचा करार केला.
२०१० च्या एनपीटीच्या परिषदेत एकमताने ठरवलेल्या उद्दिष्टाचे हे उल्लंघन असल्याचे आयएईएने आपल्या अहवालात म्हटले आहे. एनपीटी परिषदेत आयएईएच्या दिशा-निर्देशांचे पालन करणा-या देशाला अणवस्त्र तंत्रज्ञान देण्याचे एकमताने ठरवण्यात आले होते. चीनने त्यावेळी होकार दिला होता. पण पाकिस्तान आयएईएच्या निर्देशांनुसार काम करत नाही.