प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनने वाढवल्या लष्करी पायाभूत सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 02:09 AM2020-08-28T02:09:19+5:302020-08-28T02:09:29+5:30
पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) तिबेटमधील ग्यानत्से येथे पुलाच्या आकाराची सैनिक छावणी बांधत आहे. ही छावणी जमिनीवर असलेल्या सैनिक दलांसाठी असावी, असे दिसते
नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील डेपसँग आणि पॅनगोंग त्सो भागांत लष्करी तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात सतत बोलणी सुरू असली तरी चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर लष्करी पायाभूत सुविधा वाढवल्या आहेत, तसेच मोठ्या प्रमाणावर सैन्य तुकड्यांना राहण्यासाठी बांधकामही सुरू केले आहे. याशिवाय रस्ते बांधकाम आणि व्यूहरचनात्मक क्षेपणास्त्रेही तैनात केली आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) तिबेटमधील ग्यानत्से येथे पुलाच्या आकाराची सैनिक छावणी बांधत आहे. ही छावणी जमिनीवर असलेल्या सैनिक दलांसाठी असावी, असे दिसते. बांधकामाला सुरुवात झाली ती जानेवारी २०२० नंतर आणि २०२१ च्या वसंत ऋतूमध्ये ते पूर्ण होईल, अशी शक्यता आहे. या नव्या सैनिक छावणीत सहा बटालियन एरिया हेडक्वॉर्टर्स आणि प्रशासकीय भाग आहे. ६०० पेक्षा जास्त वाहने आणि उपकरणांसाठी तेथे जागा आहे.
नाव न सांगण्याच्या अटींवर लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, ‘हा नवा पूल अशा ठिकाणी आहे की, तेथून तो अरुणाचल प्रदेशचा पश्चिमेकडील भाग आणि सिक्कीमकडे सहज जाता येईल.
आम्ही आता योग्यरीत्या हाताळत आहोत -विडोंग
गलवान खोºयात चीन-भारत यांच्यातील तणावात २० भारतीय जवानांचा झालेला मृत्यू हा दुर्दैवी होता. घडलेली ही घटना ना भारताला आवडी ना चीनला. आता मात्र आम्ही योग्य पद्धतीने हाताळण्याचे काम करीत आहोत, असे चीनचे भारतातील राजदूत सन विडोंग यांनी म्हटले.