चीनच्या कुरापती सुरूच; अरुणाचल प्रदेशवरही दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 02:13 AM2020-09-08T02:13:58+5:302020-09-08T02:14:05+5:30
नवी दिल्ली : जगभरात कोरोनामुळे नाचक्की होत असतानाही चीनचा उर्मटपणा सुरूच आहे. आता चीनने भारताच्या अरुणाचल प्रदेशावरच दावा सांगितला ...
नवी दिल्ली : जगभरात कोरोनामुळे नाचक्की होत असतानाही चीनचा उर्मटपणा सुरूच आहे. आता चीननेभारताच्याअरुणाचल प्रदेशावरच दावा सांगितला आहे. अरुणाचल प्रदेश असा काही प्रदेश नसून, तो तिबेटचाच भाग असल्याची बतावणी चीनने केली आहे.
चीनच्या हद्दीत चुकून प्रवेश केलेल्या अरुणाचलच्या पाच जणांविषयी कोणतीही माहिती नसल्याचेही चीनने म्हटले आहे. या भारतीयांचे चीनच्या लष्कराने अपहरण केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात भारताने लष्करी स्तरावर चीनकडे विचारणाही केली आहे. हे पाचही जण सुबनसिरी जिल्ह्यातील राहणारे असून, त्यांची नावेही प्रसिद्ध झाली आहेत.
भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न जवानांनी उधळल्यानंतरही चीनचे डोळे उघडले नाहीत. आता त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाने अरुणाचल आमचाच भाग असल्याचे म्हटले आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. चीनला भारताने वारंवार दणका दिला. अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलियानेही चीनच्या सीमा विस्तारवादी भूमिकेवर अनेकदा चिंता व्यक्त केली.