काश्मीरचं वातावरण दूषित करण्यात चीनचाही हात- मेहबूबा मुफ्ती

By admin | Published: July 15, 2017 02:16 PM2017-07-15T14:16:20+5:302017-07-15T14:47:18+5:30

काश्मीरमध्ये ज्या हिंसेच्या घटना घडत आहेत. त्यामागे बाहेरच्या शक्ती आहेत. आता तर चीननेही हस्तक्षेप करायला सुरुवात केली आहे

China's hands to contaminate Kashmir's environment - Mehbooba Mufti | काश्मीरचं वातावरण दूषित करण्यात चीनचाही हात- मेहबूबा मुफ्ती

काश्मीरचं वातावरण दूषित करण्यात चीनचाही हात- मेहबूबा मुफ्ती

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि.15- वर्षभरापासून जम्मू आणि काश्मीरचं वातावरण ढवळून निघालं आहे. काश्मीरमध्ये अशांतता पसरली आहे. या अशांतते मागे फुटीरतावादी आणि पाकिस्तान असल्याचा दावा केला जात आहे. आता यामागे चीनचाही हात असल्याचा दावा मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केला आहे. काश्मीरमध्ये ज्या हिंसेच्या घटना घडत आहेत. त्यामागे बाहेरच्या शक्ती आहेत. आता तर चीननेही हस्तक्षेप करायला सुरुवात केली आहे, असा दावा मुफ्ती यांनी केला आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या वर्षभरापासून अशांततेचं वातावरण आहे. तेथिल कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. जम्मू-काश्मीरमधील वातावरण दूषित करण्याचा बाहेरच्या शक्तींचा हात आहे, पण आता चीनचाही त्यात हात आहे, असा दावा मेहबूबा मुफ्ती यांनी केला. राजनाथ सिंह यांच्यासोबतच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मेहबूबा मुफ्ती यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
काश्मीरमध्ये आपण कायदा व सुव्यवस्थेची लढाई लढत नाही. जोपर्यंत संपूर्ण देश, राजकीय पक्ष या परिस्थितीत साथ देत नाहीत, तोपर्यंत ही लढाई आपण जिंकू शकत नाही, असं मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या आहेत . काश्मीरमधील अस्थिरतेच्या प्रश्नी सर्व राजकीय पक्षांनी एकजूट दाखवली आहे. याचा मला आनंद झाला आहे. सर्व जण काश्मीरच्या समस्यांचा एकत्र सामना करत आहेत, असंही त्या म्हणाल्या आहेत. राज्यात जीएसटीला मंजुरी देण्यात आली त्यावेळी राष्ट्रपतींनी आम्हाला कलम ३७० च्या मुद्द्यावर विशेष लक्ष देणार असल्याचं आश्वासन दिलं होते. कलम ३७० हा मुद्दा आमच्या भावनांशी जोडलेला आहे, असंही त्या यावेळी म्हणाल्या.
आणखी वाचा
 

"पाकिस्तानला धडा शिकवणार", शहिदाच्या मुलीचा निर्धार

जम्मू काश्मीर : चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा

अमरनाथ यात्रा हल्ला: पीडीपी आमदाराच्या ड्रायव्हरला अटक

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या घरी जवळपास आर्ध्यातास बैठक झाली. काश्मीर खोऱ्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकारने काय पाऊलं उचलली आहेत, याची माहितीही राजनाथ सिंह यांनी मुफ्ती यांना दिली आहे. तसंच अमरनाथ यात्रेमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली. सोमवारी अमरनाथ यात्रेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. हा हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला तर 21 जण जखमी झाले होते. या हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर यात्रेच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विविध उपाययोजना राबविल्या जातं आहेत.  

 

Web Title: China's hands to contaminate Kashmir's environment - Mehbooba Mufti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.