चीनच्या स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेमुळे भारताला धोका
By admin | Published: April 27, 2017 02:13 PM2017-04-27T14:13:54+5:302017-04-27T14:13:54+5:30
चीनच्या स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेमुळे भारताच्या सुरक्षेला बाधा पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - चीनच्या स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेमुळे भारताच्या सुरक्षेला बाधा पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दलियन शिपयार्डमध्ये चीनच्या 70,000 टनाच्या युद्धनौकेची निर्मिती सुरू आहे. येत्या चार वर्षांत ही युद्धनौका चीनच्या नौदलात दाखल होईल. त्यामुळे भारताच्या चिंतेत भर पडली आहे.
चीनसाठी समुद्राच्या क्षेत्रात दूरवर मारा करण्यासाठी हे एअरक्राफ्ट एक वरदान ठरणार आहे. त्यामुळे भारताचं नौदलही आता सतर्क झालं आहे. चीन हिंदी महासागरात स्वतःची नौसेना मजबूत बनवण्यासाठी लागोपाठ प्रयत्न करतोय. त्यामुळे भारताला हिंदी महासागरात सीमा सुरक्षेचा प्रश्न सतावतो आहे. पीपल लिबरेशन आर्मी-नेव्ही डिसेंबर 2013पासून हिंद महासागरात दूरवर मारा करणारी शस्त्रास्त्रं जमवतो आहे. यात आण्विक शक्ती आणि पारंपरिक शस्त्रांचाही समावेश आहे.
चीन स्वतःच्या राजकीय हस्तक्षेपाचा विस्तार करत आहे. तर दुसरीकडे भारत मॉरिशस, सेशल्स, पूर्व आफ्रिका, मालदीव, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार आणि कंबोडियाच्या नौसेनेच्या संबंधांवर विसंबून आहे. भारताचा स्वतःचा व्यापारी समुद्र मार्ग सुरक्षित करण्यावर जास्त भर आहे.