अरुणाचलमध्ये चीनची घुसखोरी
By admin | Published: September 27, 2016 05:36 AM2016-09-27T05:36:24+5:302016-09-27T05:36:24+5:30
लडाखपाठोपाठ अरुणाचल प्रदेशच्या सीमेवरील एका दुर्गम भागात भारताच्या हद्दीत ४५ किमी आत येऊन तिथे हक्क सांगण्यासाठी तंबू-राहुट्याही उभारल्या, असे वृत्त आहे.
Next
इटानगर/नवी दिल्ली : लडाखपाठोपाठ अरुणाचल प्रदेशच्या सीमेवरील एका दुर्गम भागात भारताच्या हद्दीत ४५ किमी आत येऊन तिथे हक्क सांगण्यासाठी तंबू-राहुट्याही उभारल्या, असे वृत्त आहे.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या आत ४५ किमी येऊन ‘प्लम पोस्ट’ येथे ९ सप्टेंबर रोजी तात्पुरते निवारे उभे केले. भारत तिबेट सीमा पोलीस आणि लष्कराला हे लक्षात येताच ‘बॅनर ड्रिल’ करून चिनी सैनिकांना माघारी धाडण्यात आले. चिनी सैनिक माघार घेण्यास राजी नव्हते. तो प्रदेश त्यांचाच असल्याचे भासवत होते. दरवर्षी या ‘प्लम पोस्ट’च्या परिसरात भारतीय सीमेत घुसण्याचे चिनी सैनिकांचे दोन-तीन तरी प्रयत्न होत असतात. (वृत्तसंस्था)