राष्ट्रप्रमुखांची बैठक सुरु असतानाच चीनची घुसखोरी
By admin | Published: July 17, 2014 09:50 AM2014-07-17T09:50:02+5:302014-07-17T13:28:05+5:30
झीलमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिंनपिंग यांची गळाभेट सुरु असतानाच चीन सैन्याच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने सलग दोन दिवस भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केला.
Next
ऑनलाइन टीम
लेह, दि. १७ - ब्राझीलमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिंनपिंग यांची गळाभेट सुरु असतानाच चीन सैन्याच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने सलग दोन दिवस भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केला. मात्र भारतीय जवानांनी हे प्रयत्न उधळून लावले.
ब्राझील येथे दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात बैठक झाली. ब्रिक्समध्येही या दोन्ही देशांमधील सीमा रेषेच्या वादावर तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली गेली. मात्र ब्राझीलमध्ये हिंदी - चिनी भाई भाईचा नवा अध्याय लिहीला जात असतानाच चीन सैन्याने भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केले. गेल्या तीन दिवसांत जम्मू काश्मीरमधील लडाख सेक्टरमधील देमचोक आणि चूमार या भागांमध्ये चीन सैन्याच्या पीपल्स लिबेलरेशन आर्मी या तुकडीच्या जवानांनी भारतीय हद्दीत घसुखोरीचा प्रयत्न केला. देमचोकमधील चार्डिंग नीलू नाला जंक्शन येथे चीन सैन्याच्या जवानांनी वाहनासह प्रवेश केला. हा भाग चीनच्या हद्दीत असल्याचे या जवानांचे म्हणणे होते. मात्र भारतीय जवानांनी त्यांना रोखून ठेवले. अखेरीस अर्धा तासानंतर चीन सैन्याला माघार घ्यावी लागली.