चीनचे दूध व उत्पादनांवर आणखी चार महिने बंदी; केंद्राचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 06:50 AM2018-12-26T06:50:01+5:302018-12-26T06:50:20+5:30
सरकारने चीनचे दूध आणि चॉकलेट्सह दुधापासूनच्या इतर उत्पादनांच्या आयातीवर २३ एप्रिल, २०१९ पर्यंत बंदी वाढवली आहे.
नवी दिल्ली : सरकारने चीनचे दूध आणि चॉकलेट्सह दुधापासूनच्या इतर उत्पादनांच्या आयातीवर २३ एप्रिल, २०१९ पर्यंत बंदी वाढवली आहे. वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी प्रसिद्धीस दिलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली आहे.
चीनमधील ‘दूध, दुधाच्या उत्पादनांवर (चॉकलेट्स, चॉकलेटसची उत्पादने, कँडीजसह दूध आणि दुधाच्या भुकटीचा घटक
म्हणून वापर असलेली) आणखी
चार महिन्यांसाठी (२३ एप्रिल,
२०१९) किंवा पुढील आदेशापर्यंत
बंदी वाढवण्यात आली आहे, असे विदेश व्यापार महासंचालकांनी (डीजीएफटी) निवेदनात म्हटले.
ही बंदी पहिल्यांदा सप्टेंबर २००८ मध्ये घालण्यात आली होती व नंतर ती वेळोवेळी वाढवण्यात आली. शेवटच्या बंदीची मुदत २३ डिसेंबर रोजी संपली. डीजीएफटी हा वाणिज्य मंत्रालयाचा भाग असून तो देशातील आयात व निर्यातीशी संबंधित कामे पाहतो.
चीनकडून जी निर्यात भारतात
होते त्यातील दुधाच्या काही पदार्थांत मेलामाईन असावे, या भीतीतून
बंदी घालण्यात आली आहे. मेलामाईन हे विषारी रसायन प्लास्टिक्स आणि खते निर्मितीत वापरले जाते. भारत चीनकडून
दूध आणि दुधाचे पदार्थ आयात
करीत नाही तरीही प्रतिबंधात्मक
उपाय म्हणून ही बंदी घालण्यात आली आहे.
भारत हा दूधाचा जगातील सर्वात मोठा उत्पादक आणि उपभोक्ता आहे. भारतात वर्षाला सुमारे १५० दशलक्ष टन दुधाचे उत्पादन होते. उत्तर प्रदेश हा दूध उत्पादनात आघाडीवर असून त्यानंतर राजस्थान व गुजरातचा क्रमांक आहे.
भारतावर परिणाम होण्याची शक्यता नाही
च्चीनमधील दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीवरील बंदीला मुदतवाढ दिली असली तरी त्याचा परिणाम देशावर होण्याची अजिबात शक्यता नाही.
च्मुळात चीन हा दूध वा दुग्धजन्य पदार्थांसाठी प्रसिद्ध देश नाही.
त्यामुळे तेथून ते पदार्थ आयात न केल्याचा भारतावर परिणाम होण्याची शक्यता नाही, असे अधिकाल्याने सांगितले.