चीनचा पुन्हा खाेडसाळपणा; अरुणाचल, अक्साईवर दावा, नव्या नकाशावरून भारताने फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 05:43 AM2023-08-30T05:43:07+5:302023-08-30T05:43:29+5:30

चीनच्या नैसर्गिक संसाधन मंत्रालयाच्या नकाशा सेवेच्या वेबसाइटवर एक नवीन नकाशादेखील लाँच करण्यात आला आहे.

China's reluctance, claim on Arunachal, Aksai, India reprimanded from new map | चीनचा पुन्हा खाेडसाळपणा; अरुणाचल, अक्साईवर दावा, नव्या नकाशावरून भारताने फटकारले

चीनचा पुन्हा खाेडसाळपणा; अरुणाचल, अक्साईवर दावा, नव्या नकाशावरून भारताने फटकारले

googlenewsNext

नवी दिल्ली : चीनने सोमवारी आपला अधिकृत नकाशा प्रसिद्ध केला असून, यामध्ये भारताचा अरुणाचल प्रदेश, अक्साई चीन, तैवान आणि वादग्रस्त दक्षिण चीन समुद्र आपल्या हद्दीत दाखवला आहे. ‘ग्लोबल टाइम्स’ या चीनच्या अधिकृत वृत्तपत्राने एक्स सोशल मीडियावर दुपारी ३:४७  वाजता नवीन नकाशा पोस्ट केला.
चीनच्या नैसर्गिक संसाधन मंत्रालयाच्या नकाशा सेवेच्या वेबसाइटवर एक नवीन नकाशादेखील लाँच करण्यात आला आहे. चीन आणि जगातील विविध देशांच्या सीमा रेखाटण्याच्या पद्धतीच्या आधारे हा नकाशा तयार करण्यात आला आहे.
नावे बदलल्याने वास्तव बदलणार 
नाही : भारताची प्रतिक्रिया
चीनच्या खाेडसाळ 
कृत्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले होते. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले होते, चीनच्या अशा कारवाया याआधीही आमच्याकडे आल्या आहेत. आम्ही ही नवीन नावे नाकारतो. चीनची अशी पावले सीमाप्रश्नाला किचकट बनवितील

चीनने यापूर्वीही बदलली हाेती नावे
यापूर्वी एप्रिल २०२३ मध्ये चीनने आपल्या नकाशात अरुणाचल प्रदेशातील ११ ठिकाणांची नावे बदलली होती. चीनने गेल्या पाच वर्षांत तिसऱ्यांदा अशी कुरापत केली आहे. यापूर्वी २०२१ मध्ये चीनने १५ आणि २०१७ मध्ये ६ ठिकाणांची नावे बदलली होती.
‘चीनला उघडे पाडा’ 
चीनने बळजबरीने अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीन या भागांची नावे आपल्या नकाशात घेतली असली तरी भारताचा नकाशा ते बदलू शकत नाही. चीनने केलेल्या अतिक्रमणाचा जी-२० परिषदेमध्ये मुद्दा जागतिक स्तरावर उघड करण्याची भारताला मोठी संधी आहे, असे काॅंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. 

Web Title: China's reluctance, claim on Arunachal, Aksai, India reprimanded from new map

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.