चीनचं रॉकेट परीक्षण फेल झाल्यानं भारताला स्पेस लीडर बनण्याची संधी
By admin | Published: July 4, 2017 04:19 PM2017-07-04T16:19:57+5:302017-07-04T16:48:15+5:30
लाँग मार्च 5 या रॉकेटच्या परीक्षणात अपयश आल्यामुळे चीनच्या अवकाश कार्यक्रमाला मोठा धक्का बसला आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - लाँग मार्च 5 या रॉकेटच्या परीक्षणात अपयश आल्यामुळे चीनच्या अवकाश कार्यक्रमाला मोठा धक्का बसला आहे. चीनचं रॉकेट परीक्षण फेल झाल्यामुळे चंद्रावरून नमुना आणण्याच्या चीनच्या अभियानाला झटका बसला आहे. त्यामुळे चीनचा प्रतिस्पर्धी असलेल्या भारतालाही पुढे जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. भारतानं आधीच मंगळयान यशस्वीरीत्या मंगळ ग्रहावर पाठवलं आहे. तसेच त्या ग्रहासोबत 104 इतर उपग्रहही पाठवून अवकाश संशोधन क्षेत्रात पुढे असल्याचं भारतानं सिद्ध केलंय.
इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, चीनचा अंतरिक्ष कार्यक्रम तंत्रज्ञानाच्या जगातही संकटांनी घेरलेला आहे. चीननं स्वतःच्या अवकाश कार्यक्रमातील अपयश टाळण्यासाठी खूपच सावधानी बाळगली होती. मात्र एक ना एक दिवस असं होणार हे माहितीच होतं, असं चीनचे अवकाश संशोधन कार्यक्रमाचे तज्ज्ञ जोआन जॉनसन फ्रीज म्हणाले आहेत. 2 जुलै रोजी प्रक्षेपणादरम्यान अनियमिततेमुळे चीनला दुस-यांदा मालवाहक रॉकेट लाँग मार्च 5च्या परीक्षणात अपयश आलंय. चीनच्या दक्षिण प्रांतातील हैनानमधल्या वेनचांग येथील अवकाश तळावरून 2 तारखेला रविवारी संध्याकाळी स्थानिक वेळेनुसार 7 वाजून 23 मिनिटांनी या रॉकेटनं उड्डाण केलं होतं. मात्र अनियमिततेमुळे ते परीक्षण फेल झालं होतं. सर्वात वजनदार शिजियान -18 या उपग्रहाला उड्डाण करायचे होते. चीन यंदा चांग - 5 रॉकेटला चंद्र अभियानासाठी रवाना करण्याआधीच लाँग मार्च 5 या रॉकेटच्या परीक्षणात अपयश आलं आहे. शिजियान -18 या उपग्रहाचं वजन 7.5 टन इतके असून, त्यात चीननं अत्याधुनिक प्रणाली बसवली होती. अवकाशात कार्यक्रमात चीननं आतापर्यंतचा सर्वात वजनी उपग्रह प्रक्षेपित केला होता.
(VIDEO : इस्त्रोने एकाचवेळी 31 उपग्रहांचे केले यशस्वी प्रक्षेपण)
भारताने दाखवला ‘१०४ का दम’, इस्त्रोचा विश्वविक्रम
गेल्या काही दिवसांपूर्वीच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला होता. अंतराळ मोहिमेत इस्रोनं आणखी एक पाऊल पुढे टाकले. अत्याधुनिक संचार उपग्रह जीसॅट 17 चे गुरुवारी फ्रेंच गयानामधून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते. ‘एरियन- 5’ या प्रक्षेपकाच्या माध्यमातून जीसॅट 17 हे अंतराळात झेपावले होते.
जीसॅट 17चे वजन जवळपास 3477 किलोग्रॅम एवढे आहे. या उपग्रहात दूरसंचार सेवेसाठी नॉर्मल सी बँड, एक्स्टेंडेड सी बँड आणि सी बँड आहे. यात हवामानासंबंधी माहिती मिळवण्यासाठी उपकरणही बसवण्यात आले आहे. शिवाय सर्च आणि रेस्क्यू सेवेसाठी जीसॅट 17 ची मदत होणार आहे. दरम्यान, नियोजित वेळाच्या काही मिनिटं उशिरानं हे उपग्रह आकाशात झेपावले. भारतीय वेळेनुसार बुधवारी उशीरा रात्री 2.29 वाजण्याच्या सुमारास उपग्रह उड्डाण भरावयास हवे होते. जीसॅट 17 यशस्वीरित्या आकाशात झेपावल्यानंतर यासंबंधी माहिती देणारे ट्विटही एरियन स्पेसचे सीईओ स्टीफन इस्राइल यांनी केले. दरम्यान या महिन्यात इस्त्रोद्वारे प्रक्षेपित करण्यात आलेले हे तिसरे उपग्रह आहे.