चिनी राजदूत बसले थेट जमिनीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 01:07 AM2017-12-16T01:07:38+5:302017-12-16T01:07:52+5:30

अनोळखी गर्दीत हे राजदूत कुणाला तरी शोधत होते. कार्यक्रमास अवकाश होता. पाहुण्यांचे आगमन झाले होते. पाहुण्यांमध्ये उपराष्ट्रपती, केंद्रीय मंत्री, दिल्लीचे मुख्यमंत्री होते. हॉलमध्ये सर्वात मागे हे राजदूत उभे होते.

Chinese ambassador sat directly on the ground! | चिनी राजदूत बसले थेट जमिनीवर!

चिनी राजदूत बसले थेट जमिनीवर!

Next

- टेकचंद सोनवणे ।

नवी दिल्ली : अनोळखी गर्दीत हे राजदूत कुणाला तरी शोधत होते. कार्यक्रमास अवकाश होता. पाहुण्यांचे आगमन झाले होते. पाहुण्यांमध्ये उपराष्ट्रपती, केंद्रीय मंत्री, दिल्लीचे मुख्यमंत्री होते. हॉलमध्ये सर्वात मागे हे राजदूत उभे होते. हजार जणांच्या गर्दीतून वाट काढत राजदूत पोहोचले, ते थेट पहिल्या रांगेत. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याकडे.
खांदे झुकवत त्यांनी मनमोहनसिंग यांना अभिवादन केले. त्यांच्याशी गप्पा मारू लागले. बसलेल्या मनमोहनसिंग यांच्याशी बोलताना उंचपु-या राजदूतास अडचण होत होती. सारे राजनयिक शिष्टाचार बाजूला ठेवत ते खाली बसून संवाद साधू लागले.

- ‘दै. लोकमत’च्या कार्यक्रमात चिनी राजदूताचा साधेपणा सर्वांच्याच नजरेत भरला! लुओ कोणत्याही अधिका-यास मिळणारा, राजशिष्टाचार न घेता आले. अशोका हॉटेलच्या कन्व्हेंशन हॉलमधील भरगच्च गर्दीचा ते एक भाग झाले. हॉलमध्ये सर्वात मागे उभे राहिले. थोड्याच जणांनी त्यांना ओळखले. थोडीफार ‘मँडरीन’ येणा-या एका पत्रकाराने त्यांच्याशी संवाद साधला. पहिल्या रांगेत बसण्याची विनंती त्यांनी नम्रपणे नाकारली. मनमोहनसिंग यांच्या प्रकृतीची चौकशी त्यांनी केली. अवघ्या दोन मिनिटांच्या चर्चेत लुओ यांनी राजनयिक संबंधांचा नवा आयाम प्रस्थापित केला. कार्यक्रम संपल्यावर चर्चा होती ती चिनी राजदूताच्या संयत विनम्रतेची!

Web Title: Chinese ambassador sat directly on the ground!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.