देशभरात चिनी अॅप्स बंद करण्यासाठी आता दूरसंचार कंपन्या उचलणार मोठं पाऊल!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 11:45 AM2020-06-30T11:45:12+5:302020-06-30T12:46:43+5:30
या कंपन्या सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा करीत आहेत. ऑर्डर मिळाल्यानंतर त्वरित त्यावर प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
नवी दिल्ली- लोकप्रिय चिनी अॅप टिकटॅक हॅलोसह मोदी सरकारनं ५९ ऍप्सवर बंदी घातली आहे. हे चिनी अॅप्सच्या माध्यमातून गोपनीय संरक्षण धोक्यात असल्याचं मानलं गेलं आहे. त्यानंतर भारतात गुगल प्ले स्टोअर ती काढून टाकण्यात आली आहेत. सूत्रांकडून सीएनबीसीला मिळालेल्या माहितीनुसार, आता दूरसंचार कंपन्याही हे ऍप वापरणं थांबविण्यासाठी तयार आहेत. या कंपन्या सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा करीत आहेत. ऑर्डर मिळाल्यानंतर त्वरित त्यावर प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
गलवान खो-यात भारत आणि चिनी सैनिक यांच्यात रक्तरंजित चकमकीनंतर देशात चिनी वस्तूंचा निषेध केला जाऊ लागला आहे. चिनी अॅपवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सोशल मीडियामध्ये सुरू होता. त्याच वेळी आता भारत सरकारने चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे.
टेलिकॉम कंपन्या ही अॅप्स कशी बंद करतील -
टेलिकॉम कंपन्या त्या ऍप्सना रोखण्यासाठी केंद्र सरकारसारखीच पावले उचलतील, वेबसाइटवरूनही ती हटवली जातील आणि त्यांच्याशी संबंधित डेटाही थांबविला जाईल. दूरध्वनी कंपन्यांचे म्हणणे आहे की, कोणतेही अॅप बंद करण्याचे तंत्रज्ञान त्यांच्याकडे आहे. फक्त त्या अॅपचा आयपी बंद करावा लागेल. त्यानंतर अॅप कार्य करणे बंद करेल.
विशेष म्हणजे भारताबद्दल बोलायचं झाल्यास त्यालाही हे ऍप्स बंद केल्यानं नुकसान होणार आहे. इथले लोक हॅलो, लाईकी, व्हिटोस, टिकटॉक, यूसी ब्राऊझर सारखे अॅप्स मोठ्या प्रमाणात वापरतात, ज्यांना चीनकडून बरेच पैसे मिळतात. बर्याच भारतीयांना या अॅप्सद्वारे रोजगार देखील मिळाला आहे आणि बर्याच लोकांसाठी हे अॅप्स कमाईचे साधनही बनले आहेत. लोक व्हिडीओ बनवून पैसे कमावत आहेत. याचाच अर्थ असा आहे की, चीनसह भारतातील अनेक लोकांचेही मोठे नुकसान होणार आहे.
हेही वाचा
चीनचे ५९ अॅप बंद केल्यानं काय बदलणार अन् भारताला कसं नुकसान होणार?, जाणून घ्या...
पाणबुडीनंतर घुसखोरी करणारं चिनी बॉम्बर विमान जपाननं लावलं पळवून; चीननं दिली धमकी
CoronaVirus: कोरोनाची तीन नवीन लक्षणं आली समोर, CDCने अपडेट केली यादी
आपल्याला चीनशी लढायचे आहे, सरकारच्या विरोधकांशी नाही; शिवसेनेचा टोला
आजचे राशीभविष्य - 30 जून 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना आज अचानक धनाचा लाभ होणार
बंपर भरती! 'या' कंपन्या भारतात देणार ४० हजारांहून जास्त रोजगार, जाणून घ्या...