Chinese Apps Banned: भारताची चीनवर डिजिटल स्ट्राइक; तातडीने बॅन केले 232 लोन आणि बेटिंग अॅप्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 02:20 PM2023-02-05T14:20:22+5:302023-02-05T14:20:38+5:30

Chinese Apps Banned: भारत सरकारने चीनी कनेक्शन असलेल्या लोन आणि बेटिंग अॅप्सवर बंदी घातली आहे.

Chinese Apps Banned: India's Digital Strike on China; Banned 232 loan and betting apps | Chinese Apps Banned: भारताची चीनवर डिजिटल स्ट्राइक; तातडीने बॅन केले 232 लोन आणि बेटिंग अॅप्स...

Chinese Apps Banned: भारताची चीनवर डिजिटल स्ट्राइक; तातडीने बॅन केले 232 लोन आणि बेटिंग अॅप्स...

googlenewsNext


App Ban : भारत सरकारने चीनी कनेक्शन असलेल्या लोन आणि बेटिंग अॅप्सवर बंदी घातली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या अॅप्सवर कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने बंदी घातलेल्या अॅप्समध्ये 138 बेटिंग अॅप्स आणि 94 लोन अॅप्स आहेत. या अॅप्समुळे भारताच्या सुरक्षा आणि अखंडतेला धोका होता.

चीनशी संबंध
या अॅप्सचा चीनशी संबंध असल्याचे बोलले जात आहे. सूत्रांच्या हवाल्याने असे सांगण्यात आले आहे की, या अॅप्सना आपत्कालीन आणि तातडीने ब्लॉक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकूण 232 अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. आयटी कायद्याच्या कलम 69 अंतर्गत या अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला याची माहिती दिली होती. त्यानंतर या अॅप्सवर कारवाई करण्यात आली. 

थर्ट पार्टी वेबसाइटवर उपलब्ध 
स्मार्टफोनवर डाउनलोड करण्यासाठी बहुतेक अॅप्स प्ले स्टोअरवर उपलब्ध नाहीत, पण थर्ड पार्टी लिंक किंवा वेबसाइटवरून डाउनलोड केले जाऊ शकतात. अनेक अॅप्स थेट सोशल मीडिया साइटवरून ऑनलाइन देखील प्ले केले जाऊ शकतात. यापैकी अनेक अॅप्स क्रिप्टोकरन्सीमध्ये पेमेंट स्वीकारतात. 

माहिती आणि प्रसारण मंत्रालयने म्हटले की, भारतातील बहुतेक भागांमध्ये बेटिंग आणि जुगार बेकायदेशीर आहे. याची जाहिरात करण्यावरही ग्राहक संरक्षण कायदा 2019, केबल टीव्ही नेटवर्क नियमन कायदा 1995 आणि आयटी नियम 2021 अंतर्गत बंदी आहे. मंत्रालयाने ऑनलाइन जाहिरात कंपन्यांनाही भारतीय प्रेक्षकांना अशा जाहिराती न दाखवण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे अनेक लोकांची आर्थिक आणि सामाजिक-आर्थिक स्थिती बिघडू शकते. या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: Chinese Apps Banned: India's Digital Strike on China; Banned 232 loan and betting apps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.