पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये चीनी लष्कर
By admin | Published: March 13, 2016 03:43 PM2016-03-13T15:43:04+5:302016-03-13T15:43:04+5:30
भारतीय हद्दीत लडाखमध्ये वारंवार घुसखोरी करणा-या चीनी लष्कराचा पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये वावर आढळून आला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - भारतीय हद्दीत लडाखमध्ये वारंवार घुसखोरी करणा-या चीनी लष्कराचा पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये वावर आढळून आला आहे. उत्तरकाश्मीरमध्ये नावगाम सेक्टरमध्ये पाकिस्तानला लागून असणा-या सीमाभागात चीनी लष्कराचे अधिकारी कार्यरत आहेत.
पाकिस्तानी लष्काचे जे संदेश इंटरसेप्ट केले आहेत त्यानुसार सीमाभागात इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामासाठी चीनी लष्कर इथे आले आहे. भारतीय लष्कराने अद्यापपर्यंत याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नसली तरी, भारतीय लष्कराने चीनी लष्कराच्या उपस्थितीबद्दल गुप्तचरयंत्रणांना सर्तक केले आहे.
सर्वप्रथम २०१५ मध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनी लष्कर दिसले होते. त्यानंतर आता तंगधार सेक्टरच्या जवळही चीनी लष्कराच्या हालचाली वाढल्या आहेत. या भागात चीनची सरकारी कंपनी झेलम-नीलम ९७० मेगावॅट क्षमतेचा ऊर्जा प्रकल्प उभारत आहे.
पीओकेमधील लीपव्हॅलीमध्ये पर्यायी रस्ता म्हणून चीनने बोगदा बांधणीचेही काम हाती घेतले आहे. चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोअर उभारत आहे. त्यासाठीच चीनी अधिका-यांच्या पीओकेमधील फे-या वाढल्याचे रणनितीक तज्ञांचे मत आहे. या प्रकल्पातंर्गत कराचीतील ग्वादर बंदर चीनमधील शिनजिंयागला जोडले जाणार आहे.