चीनच्या हेलिकॉप्टर्सची LACच्या हद्दीत घुसखोरी, भारतीय IAF लढाऊ विमानांनी लावलं हुसकावून
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 10:59 AM2020-05-12T10:59:05+5:302020-05-12T12:49:28+5:30
गेल्या काही दिवसांपूर्वीही चिनी लष्करी हेलिकॉप्टर्स भारतीय हद्दीत घिरट्या घालताना दिसली होती. त्यावेळीसुद्धा भारतीय हवाई क्षेत्राचे त्यांनी उल्लंघन केले होते.
नवी दिल्लीः कोरोना संकटाचा अनेक देश सामना करत असतानाच चीनच्या कुरापती सुरूच आहेत. लॉकडाऊनदरम्यान चीनने पुन्हा एकदा भारतीय सीमा ओलांडली आहे. चीनला योग्य ते प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाने लडाखमध्ये लढाऊ विमान तैनात केली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीही चिनी लष्करी हेलिकॉप्टर्स भारतीय हद्दीत घिरट्या घालताना दिसली होती. त्यावेळीसुद्धा भारतीय हवाई क्षेत्राचे त्यांनी उल्लंघन केले होते.
चिनी हेलिकॉप्टरची हालचाल सुरू होताच भारतीय लढाऊ विमानांना लडाख सेक्टरमधील सीमा भागात तैनात करण्यात आले. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी जवळच्या बेसकॅम्पवरून उड्डाण भरले आणि चिनी हेलिकॉप्टर्सला हुसकावून लावले. विशेष म्हणजे अशा स्थितीतही भारतीय लढाऊ विमानांनी भारतीय हवाई क्षेत्राचे उल्लंघन केले नाही. गेल्या आठवड्यात अशी घटना घडली होती, जेव्हा भारतीय आणि चिनी सैनिक एकमेकांसमोर आले होते. यानंतर दीडशेहून अधिक चिनी सैन्याच्या जवानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. लढाऊ विमान तैनात करून हवाई क्षेत्राचे उल्लंघन करण्याच्या चिनी प्रयत्नांना बर्याच वर्षांत प्रथमच प्रतिसाद मिळाला आहे.
चिनी आक्रमकतेचे उद्दिष्ट पाकिस्तानला पाठिंबा देणे आणि भारतासमवेत नवीन आघाडी उघडण्याचं आहे. त्याचबरोबर कोरोनाबद्दलच्या आरोपांवरून जगाचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे. चीनप्रमाणेच पाकिस्तानची लढाऊ विमानही सीमा भागात निरंतर उडत आहेत. पाकिस्तानी हवाई दलाचे विमान एफ -16, जेएफ -17 आणि मिराज सीमावर्ती भागात गस्त घालत आहेत. हंदवाडा हल्ल्यानंतर भारताकडून होऊ घातलेल्या कारवाईमुळे पाकिस्तान घाबरलेला आहे. त्याचदरम्यान भारतीय वायु सेना प्रत्येक क्षणी पाकिस्तानच्या हालचालींवर नजर ठेवून आहे. एप्रिलच्या अखेरपासून ‘पीएलए’ने आक्रमक पवित्रा घेतल्याने या ताज्या घटनांना सुरुवात झाली आहे. २७ एप्रिल रोजी चिनी सैन्याचे एक वाहन भारताच्या हद्दीत आले होते. भारतीय सैनिकांनी हटकल्यावर ते परत माघारी गेले होते.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लडाकमधील पॅनगाँग त्से सरोवराच्या उत्तर किना-यावर तसेच चुमार व यांगत्से भागातही अशाच घटना घडल्या होत्या. त्याआधी जून २०१७ मध्ये सिक्कीमजवळच्या डोकलाम पठारावर दोन्ही सैन्यांमध्ये ७३ दिवसांचा वाद झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात वुहान येथे पहिली अनौपचारिक शिखर बैठक झाल्यानंतर त्या वादावर पडदा पडला होता.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : येत्या दोन ते तीन दिवसांत सरकार नवं पॅकेज देणार, नितीन गडकरींचं मोठं विधान
CoronaVirus : निसर्गाचा चमत्कार! बिजनौरहून स्पष्ट दिसतोय नैनितालचा पर्वत
भारतीय जवानांशी सिक्कीममध्ये भिडल्यानंतर चीननं दिली अशी प्रतिक्रिया
लॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेसाठी आत्मघातकी ठरेल- आनंद महिंद्रा