लडाख सीमेजवळ चिनी फायटर जेटच्या घिरट्या; 'ड्रॅगन'च्या कुरापतींवर भारताची नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 04:55 PM2020-06-01T16:55:01+5:302020-06-01T16:58:09+5:30
चीनने ल़डाखपासून जवळ असलेल्या आणि सुमारे १०० - १५० किमी अंतरावर असलेल्या होतान आणि गारगुनसा येथील चीनच्या तळांवर लढाऊ विमाने तैनात केली आहेत.
नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून भारतीय सीमेवर तणावाचे वातावरण असून पूर्व लडाखमध्ये चीनची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पूर्व लडाख येथून 3०-35 किमीवर उड्डाण करणाऱ्या चिनी लढाऊ विमानांच्या हालचालीवर भारताचे सैन्य बारकाईने लक्ष ठेवून आहेत. ड्रॅगनच्या या कुरापतींवर भारताची करडी नजर आहे.
चीनने ल़डाखपासून जवळ असलेल्या आणि सुमारे १०० - १५० किमी अंतरावर असलेल्या होतान आणि गारगुनसा येथील चीनच्या तळांवर लढाऊ विमाने तैनात केली आहेत. लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ चार ठिकाणी भारत आणि चीनचे सैनिक समोरा-समोर उभे आहेत. चिनी एअर फोर्सच्या प्रत्येक हालचालीकडे भारताची करडी नजर आहे. होतान आणि गारगनसा या पीएलएच्या (पीपल्स लिबरेशन आर्मी) एअर फोर्स स्टेशनवर चीनने सध्याच्या घडीला १० ते १२ फायटर विमाने तैनात केली आहेत.
पूर्व लडाखच्या सीमेपासून ३० किलोमीटर अंतरावर जे-११ आणि जे-७ या फायटर विमानांचे उड्डाण सुरु होते. सीमा रेषेपासून आवश्यक अंतर राखून या विमानांचे उड्डाण सुरु होते. भारताच्या सीमेनजीकच या विमानांचे उड्डाण सुरु होते असून त्यावर आमची नजर असल्याची माहिती सूत्रांनी एएनआयला सांगितले. ते म्हणाले की, त्यांचे लढाऊ विमान होतान आणि गारगुनसामधील हवाई तळांवरुन बेकायदा हल्ले करीत आहेत आणि लडाख प्रदेशातील आमच्या प्रदेशातून 30--35 किमी अंतरावर आहेत. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार ते भारतीय क्षेत्रापासून दहा किलोमीटर अंतरावर आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
धक्कादायक! पोलीस कर्मचाऱ्याचा तरुणीवर बलात्कार; विवाहानंतर फुटले बिंग
... म्हणून पोलिसांनी जळत्या प्रेतावर पाणी टाकलं अन् अंत्यसंस्कार विधी थांबवला
लॉकडाऊन शिथील झाल्याने चोरांचे फावले, वृद्ध महिलेचे दागिने लुटले