चिनी परराष्ट्रमंत्री आज भारतात
By admin | Published: June 8, 2014 02:01 AM2014-06-08T02:01:04+5:302014-06-08T02:01:04+5:30
भारतातील नव्या सरकारसोबत राजकीय संपर्क स्थापित करण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शि जिनपिंग यांचे विशेष प्रतिनिधी म्हणून परराष्ट्रमंत्री वांग ई रविवारी (दि. 8) भारताला भेट देणार आहेत.
Next
>बीजिंग : भारतातील नव्या सरकारसोबत राजकीय संपर्क स्थापित करण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शि जिनपिंग यांचे विशेष प्रतिनिधी म्हणून परराष्ट्रमंत्री वांग ई रविवारी (दि. 8) भारताला भेट देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीनशी असलेल्या मैत्रीमुळे द्विपक्षीय संबंधांना आणखी चालना मिळेल, अशी आशा येथे व्यक्त होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर वांग यांचा दौरा होत आहे.
वांग (61) हे आपल्या दोन दिवसांच्या दौ:यादरम्यान भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करणार आहेत. ते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. भारतातील सार्वत्रिक निवडणुकीनंतर दोन्ही सरकारमधील हा पहिलाच संपर्क आहे.
मोदींच्या शपथविधीनंतर केकियांग यांनी दूरध्वनीवर त्यांचे अभिनंदन केले होते. आपल्या दौ:यादरम्यान वांग प्रमुख भारतीय अधिका:यांची भेट घेऊन द्विपक्षीय संबंध कसे पुढे न्यावेत यावर सखोल चर्चा करणार आहेत, अशी माहिती चिनी परराष्ट्र मंत्रलयाचे प्रवक्ते होंग ली यांनी यापूर्वीच माध्यमांना दिली होती. (वृत्तसंस्था)