चिनी विदेशमंत्र्यांनी घेतली मोदी, सुषमा स्वराज यांची भेट

By admin | Published: August 14, 2016 01:54 AM2016-08-14T01:54:29+5:302016-08-14T01:54:29+5:30

चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. अणुपुरवठादार गटाचे सदस्यत्व देण्याच्या

Chinese Foreign Minister visits Modi, Sushma Swaraj | चिनी विदेशमंत्र्यांनी घेतली मोदी, सुषमा स्वराज यांची भेट

चिनी विदेशमंत्र्यांनी घेतली मोदी, सुषमा स्वराज यांची भेट

Next

नवी दिल्ली : चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. अणुपुरवठादार गटाचे सदस्यत्व देण्याच्या भारताच्या मागणीवर चर्चा झाल्याचे समजते.
इतरही काही द्विपक्षीय मुद्द्यांवर, तसेच गोव्यात आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेबाबतही वँग यांनी भारतीय नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी टिष्ट्वटरवरून ही माहिती दिली. स्वराज आणि वँग यांच्या भेटीचे छायाचित्र पोस्ट करून त्यांनी म्हटले की, उभय देशांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मुद्द्यावर स्वराज आणि वँग यांनी चर्चा केली.
वँग यांचे काल गोव्यात आगमन झाले, ते तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची भेट घेऊन त्यांनी ब्रिक्स शिखर परिषदेबाबत चर्चा केली. दिल्लीत त्यांनी पंतप्रधान मोदी यांची आणि नंतर सुषमा स्वराज यांची भेट घेतली. अणुपुरवठादार गटाचे सदस्यत्व मिळविण्याच्या प्रयत्नांना चीननेच खोडा घातला आहे. ४८ देशांच्या या गटाची बैठक जूनमध्ये झाली होती. या बैठकीत भारताला सदस्यत्व देण्याचा प्रस्ताव आला होता. तथापि, चीनने हा प्रस्ताव रोखला. यामुळे भारत-चीन संबंधांत तणाव आहे. या पार्श्वभूमीवर वँग यांच्या दौऱ्याकडे पाहिले जात आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

अणुपुरवठादार गटाचे सदस्यत्व मिळविण्याच्या प्रयत्नांना चीननेच खोडा घातला आहे. ४८ देशांच्या या गटाची बैठक जूनमध्ये झाली होती. या बैठकीत भारताला सदस्यत्व देण्याचा प्रस्ताव आला होता. तथापि, चीनने हा प्रस्ताव रोखला. यामुळे भारत-चीन संबंधांत तणाव आहे.

Web Title: Chinese Foreign Minister visits Modi, Sushma Swaraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.