चिनी कंपनी OPPO च्या अधिका-याने केला तिरंग्याचा अपमान

By admin | Published: March 28, 2017 08:27 PM2017-03-28T20:27:25+5:302017-03-28T20:33:34+5:30

चिनची मोबाइल निर्माती कंपनी OPPO च्या कार्यालयात भारताच्या राष्ट्रध्वजाचा अपमान करण्यात आल्याची घटना

Chinese insult inspector of Chinese company OPPO | चिनी कंपनी OPPO च्या अधिका-याने केला तिरंग्याचा अपमान

चिनी कंपनी OPPO च्या अधिका-याने केला तिरंग्याचा अपमान

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 28 -  चिनची मोबाइल निर्माती कंपनी OPPO च्या कार्यालयात भारताच्या राष्ट्रध्वजाचा अपमान करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कंपनीच्या काही अधिका-यांनी तिरंग्याला फाडून कच-याच्या डब्ब्यात फेकल्याचं वृत्त आहे.  नोयडा येथील सेक्टर 63 मधील कार्यालयात ही घटना घडली. 
 
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर  OPPO च्या कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आणि OPPO विरोधात निदर्शनं करण्यात आली. यानंतर सोशल मीडियावर OPPO India वर रोष व्यक्त केला जात आहे.  Oppo वर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी दखल द्यावी अशीही मागणी सोशल मीडियावर जोर धरत आहे.   
 

या प्रकरणी चौकशी करत असल्याचं OPPO India च्या अधिका-यांनी सांगितलं असं वृत्त BGRने दिलं आहे.

यापुर्वी  अॅमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईटनेही राष्ट्रध्वजाचा अपमान केला होता. कॅनडा येथील अॅमेझॉनच्या वेबसाईटवर भारताच्या राष्ट्रध्वजासारखी पायपुसणी विक्रीला ठेवण्यात आली होती. ही बाब एका नागरिकाने निदर्शनास आणून दिल्यानंतर याची दखल घेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी त्या पायपुसण्यांची विक्री त्वरित थांबवण्यास आणि बिनशर्त माफी मागण्यास सांगितले होते. यानंतर अॅमेझॉननं त्वरित वेबसाइटवरील तिरंग्याचा अपमान करणारी पायपुसणी हटवली.

 

Web Title: Chinese insult inspector of Chinese company OPPO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.