बिहार- दारूबंदीचं उल्लंघन करणारा चीनी नागरिक अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 05:55 PM2018-06-18T17:55:18+5:302018-06-18T17:55:18+5:30
बिहारमध्ये दारूबंदी कायद्याचं उल्लंघन करण्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली.
पाटणा- पाटणा पोलिसांनी एका चीनी नागरिकाला बिहारमध्ये दारूबंदी कायद्याचं उल्लंघन करण्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. तियानडॉन्ग असं या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी तियानडॉन्ग याला एका चीनी मोबाइल निर्माती कंपनीच्या गेस्ट हाऊसमधून रविवारी संध्याकाळी अटक केली.
पोलीस आता दुसरा चीनी नागरिक वू चुआंगयॉन्ग या व्यक्तीच्या पाटण्यामध्ये परत येण्याच्या विचारात आहेत. त्यानंतर त्यालाही अटक केली जाईल.
पोलिसांनी त्याला फोन केल्यावर त्याने लवकर परतण्याबद्दल सांगितलं होतं. हा व्यक्ती बिहारच्या भागलपूरमधील बेगूसरायमध्ये असल्याची माहिती पोलिसांकडे आहे. पाटणाचे एसएसपी मनू महाराज यांनी ही माहिती दिली आहे.
'इमाम गेस्ट हाऊसच्या रूम नंबर 220 बी मधून दारूच्या दोन बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. तियानयॉन्गला या बाटल्या देण्यात आल्या. तर रूम नंबर 201 बी मधून चुआंगयॉन्ग राहत होता तेथून एक आयएमएफएलची बाटली जप्त करण्यात आली आहे.
दरम्यान, पाटणाच्या अलीनगर भागात असलेल्या गेस्ट हाऊसमध्ये दोन महिलांसह 9 चीनी नागरिक राहत आहेत. कुठल्या कंपनीशी हे नागरिक जोडले आहेत याचा शोध घेतला जातो आहे.