चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग दाखल; नरेंद्र मोदींकडून जंगी स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 05:52 AM2019-10-12T05:52:37+5:302019-10-12T05:53:12+5:30

मोदी यांनी ट्विट केले की, राष्ट्रपती शी जिनपिंग, भारतात आपले स्वागत आहे.

Chinese President Xi Jinping arrives; Warm welcome from Narendra Modi | चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग दाखल; नरेंद्र मोदींकडून जंगी स्वागत

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग दाखल; नरेंद्र मोदींकडून जंगी स्वागत

Next

चेन्नई : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे शुक्रवारी दुपारी चेन्नई विमानतळावर भरतनाट्यम आणि लोकनृत्य कलाकारांनी तामिळ सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करून मोठ्या उत्साहात स्वागत केले, तर विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही कडेला उभ्या असलेल्या शाळकरी मुलांनी भारतीय आणि चिनी ध्वज झळकावीत त्यांना अभिवादन केले.
शी जिनपिंग यांच्या स्वागतासाठी विमानतळावर तामिळनाडूचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहित, मुख्यमंत्री के. पलानीस्वामी, उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम, तसेच विधानसभेचे अध्यक्ष पी. धनपाल उपस्थित होते.
जवळपास पाचशे तामिळ लोककलाकारांनी ‘ताप्पटम अािण पोईकल कुठीराही’सह तामिळ सांस्कृतिक नृत्यकलेचे सादरीकरण केले.आकर्षक रंगातील वेशभूषेतील महिलांनी भारतनाट्यम नृत्य सादर करून त्यांचे स्वागत केले. शी जिनपिंग यांनी हात उंचावून या सर्व कलाकारांच्या अभिवादनाचा स्वीकार केले. विमानतळातून बाहेर पडण्याअगोदार ते कारमध्ये बसण्याआधी मंदिराच्या पुजारींनीही त्यांचे पारंपरिकपद्धतीने स्वागत केले. शी जिनपिंग आयटीसी ग्रॅण्ड चोला हॉटेलात थोडावेळ थांबल्यानंतर ते शुक्रवारी सांयकाळी पाच वाजता कारने ते महाबलीपूरमकडे रवाना झाले.
तामिळ पोषखात
मोदींनी केले स्वागत...
महाबलीपूरस्थित अर्जुन तपस्या स्मारक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे होत त्यांचे अगत्यपूर्वक स्वागत केले.
यावेळी पंतप्रधान मोदी पांरपारिक तामिळ पोषाख परिधान केलेला होता. शी जिनपिंग यांच्याशी मोदी यांनी हस्तांदोलन करीत मोठ्या उत्साहाने त्यांचे स्वागत केले. (वृत्तसंस्था)

मोदींचे इंग्रजी, तामिळ, मंडारिन भाषेतून ट्विट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या स्वागतासाठी इंग्रजी, तमिळ, मंडारिन भाषेतून टष्ट्वीट केले. मोदी यांनीट्विट केले की, राष्ट्रपती शी जिनपिंग, भारतात आपले स्वागत आहे. तत्पूर्वी, मोदी शुक्रवारी सकाळी चेन्नईत पोहोचले.

द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होण्याची शक्यता
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग द्विपक्षीय संंबंधात संतुलन आणण्यासाठी प्रयत्नांवर चर्चा करू शकतात. या चर्चेदरम्यान कोणताही अजेंडा असणार नाही.
काश्मिरातील कलम ३७० हटविल्यानंतर प्रथमच मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात चर्चा होत आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन्ही नेते शनिवारी फिशरमॅन्स कोव रिसॉर्टमध्ये समोरासमोर बसून चर्चा करतील. त्यानंतर शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा होईल. दुपारी दोन नेत्यांचे भोजन होईल.

तिबेटी आंदोलनकर्ते ताब्यात
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग निवासासाठी असलेल्या हॉटेलबाहेर आणि विमानतळाबाहेर आंदोलन करणाºया ११ संशयित तिबेटी आंदोलकांना पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले. या आंदोलकांना पकडून पोलीस त्यांना हॉटेल परिसरातून दूर घेऊन गेले. विमानतळावरही सहा तिबेटींना ताब्यात घेण्यात आले.

Web Title: Chinese President Xi Jinping arrives; Warm welcome from Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.