भारतीय सागरी हद्दीत घुसलेल्या चिनी जहाजाला भारतीय नौदलाने लावले हुसकावून
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 04:08 PM2019-12-03T16:08:51+5:302019-12-03T16:10:49+5:30
भारतीय नौदलाच्या सागरी पळत ठेवणाऱ्या विमानाने हे चिनी जहाज शोधून काढले आणि जहाजाला हुसकावून लावले.
नवी दिल्ली - पोर्ट ब्लेअरजवळील भारताच्या सागरी हद्दीत परवानगीशिवाय घुसलेल्या संशयीत चिनी जहाजाला भारतीय नौदलाने हुसकावून लावले आहे. अंदमान - निकोबार बेटावरील पोर्ट ब्लेअरजवळ शी यान १ या चिनी जहाजाचे गुप्तपणे संशोधन कार्य सुरु होते. भारतीय नौदलाच्या सागरी पळत ठेवणाऱ्या विमानाने हे चिनी जहाज शोधून काढले आणि जहाजाला हुसकावून लावले.
भारतीच नौदलाच्या हालचाली आणि कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी हेरगिरी करण्यासाठी या जहाजाचा चीनकडून वापर होऊ शकतो असे सूत्रांनी सांगितले. नूडलच्या विमानालाभारताच्या आर्थिक क्षेत्रात (एक्सक्लुसिव्ह इंडियन इकॉनॉमी झोन) चिनी जहाज सापडले. त्यावेळी भारतीय नौदलाकडून या जहाजावर लक्ष ठेवण्यासाठी युद्धनौका पाठवण्यात आली.आंतराष्ट्रीय सागरी कायद्यानुसार अशा प्रकारे कुठल्याही देशाच्या एक्सक्लुसिव्ह इंडियन इकॉनॉमी झोनमध्ये परवानगीशिवाय दुसऱ्या देशाचे जहाज प्रवेश करू शकत नाही. नौदलाच्या युद्धनौकेने या जहाजाला भारतीय सागरी हद्दीबाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर शी यान १ हे चिनी जहाज भारतीय सागरी हद्दीतून बाहेर पडले. अलीकडेच भारतीय समुद्रात पी - ८आय या टेहळणी करणाऱ्या नौदलाच्या विमानाने चिनी ७ युद्धनौका हेरल्या होत्या. चीनच्या गुप्त हालचालींवर भारतीय नौदल डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवत आहे.
Navy drives away suspicious Chinese vessel from Indian waters
— ANI Digital (@ani_digital) December 3, 2019
Read @ANI Story | https://t.co/PKy3982y8tpic.twitter.com/jBfVlzeQA6