लडाखमध्ये चिनी सैन्याने उभारले होते तंबू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 04:39 AM2018-08-16T04:39:15+5:302018-08-16T04:39:57+5:30

मागील महिन्यात शेवटच्या आठवड्यात चिनी सैैनिक लडाखच्या दमचोक भागात घुसले होते आणि तंबूही उभारले होते. त्यानंतर ब्रिगेडस्तरीय चर्चेनंतर ते परत तर गेले मात्र, त्यांना हे आश्वासन द्यावे लागले होते की, राज्य सरकार दमचोक भागातील रस्ते निर्मितीचे काम थांबवेल. सध्या या भागात अद्यापही दोन तंबू उभारलेले आहेत.

Chinese tentacles were built in Ladakh | लडाखमध्ये चिनी सैन्याने उभारले होते तंबू

लडाखमध्ये चिनी सैन्याने उभारले होते तंबू

Next

- सुरेश डुग्गर 
नवी दिल्ली : मागील महिन्यात शेवटच्या आठवड्यात चिनी सैैनिक लडाखच्या दमचोक भागात घुसले होते आणि तंबूही उभारले होते. त्यानंतर ब्रिगेडस्तरीय चर्चेनंतर ते परत तर गेले मात्र, त्यांना हे आश्वासन द्यावे लागले होते की, राज्य सरकार दमचोक भागातील रस्ते निर्मितीचे काम थांबवेल. सध्या या भागात अद्यापही दोन तंबू उभारलेले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलैमध्ये चीनचे सैन्य पूर्व लडाखस्थित दमचोक सेक्टरमध्ये जवळपास ४०० मीटर आत घुसले होते. त्यांनी येथे पाच तंबू उभारले होते. असेही सांगितले जात आहे की, दोन्ही देशांत ब्रिगेडियर स्तराची चर्चा झाल्यानंतर चेरदांग- नेरलांग - नल्लान भागातील तीन तंंबू हटविण्यात आले. पण, दोन तंबू अद्यापही उभे आहेत. यात चिनी सैन्य पीपल्स लिबरेशन आर्मीचे (पीएलए) सैनिक राहत आहेत. भारत आणि चीनदरम्यान ४ हजार किमी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) जवळपास २३ वादग्रस्त आणि संवेदनशील भागापैकी दमचोक एक आहे. येथे सीमेची स्थिती स्पष्ट नसल्याने चीनने अनेकदा घुसखोरी केली आहे. भारतीय सैनिक येथे सदैव तत्पर असतात.
लडाखमध्ये त्रिग हाइटस, दुमशेले, चुमार, स्पांगुर दर्रा आणि पांगोंग सो यांसारखे अनेक वादग्रस्त भाग आहेत. लडाखमध्ये १९९३ मध्ये फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते आणि लोकांना चीन सीमेच्या नजीकच्या भागात जाण्यास परवानगी देण्यात आली होती त्या वेळी चिनी सैन्याची घुसखोरी आणि भारतीय शेतकऱ्यांना धमकविण्याची बाब प्रथम समोर आली होती.
घुसखोरी आणि अत्याचारांच्या घटना त्यापूर्वी फक्त सरकारी रेकॉर्डवरच नोंद करण्यात येत होत्या. घुसखोरीचे वृत्त अनेक महिन्यांनंतर लेह मुख्यालयात येत होते. हेही खरे आहे की, लेह फेस्टिव्हलमध्ये सहभागी पत्रकारांना पैगांग झीलसह चीन सीमेजवळच्या भागात दौरा करण्याची परवानगी प्रथमच देण्यात आली होती. त्यानंतर भारतीय सैन्याने चीनच्या सीमेवर गस्त वाढविण्याचा निर्णय घेतला होता. अन्यथा या भागात भारतीय सैनिक कधीतरीच दिसून येत होते. पण, चिनी सैनिक नियमित गस्त घालत होते आणि भारतीय हद्दीत आपला ताबा दाखविण्याचा प्रयत्न करत होते. लेहस्थित प्रशासकीय अधिकारी म्हणतात की, अक्साई चीनला लागून असलेल्या भागावर चीन आपला ताबा दाखवत तेथे पाय रोवू पाहत आहे.

‘राजनैतिक स्तरावरच चर्चेने प्रश्न सोडवावा’

डोकलाममध्ये जून २०१६ मध्ये भारत आणि चीनच्या सैैन्यात तणाव वाढला होता. त्या वेळी चीनचे सैनिक रस्ता तयार करण्याचा प्रयत्न करत होते. लडाख सेक्टरमध्ये चिनी सैन्याची घुसखोरी कधी थांबली नाही ही वस्तुस्थिती आहे.
१९६२ च्या चिनी हल्ल्यानंतर आजही घुसखोरी सुरू आहे. लडाखच्या दिशेने सैन्य आणि तोफखान्यांत भर पडत असली तरी हा प्रश्न राजनैतिक स्तरावरच चर्चेने सोडविण्याचा प्रयत्न आहे, असे येथील प्रशासकीय अधिकारी सांगतात.

Web Title: Chinese tentacles were built in Ladakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.