नेपाळमधून हाेतेय चक्क चिनी टाेमॅटाेची तस्करी, नातेवाईकांना आर्जव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 07:13 AM2023-07-22T07:13:11+5:302023-07-22T07:14:09+5:30
दुबईतून येताना टाेमॅटाे आणण्याची गळ!
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशात गेल्या काही आठवड्यांपासून टाेमॅटाेचे दर गगनाला भिडले आहेत. काही ठिकाणी तर २०० रुपये प्रतिकिलाे या दराने विक्री झाली. एवढे दर वाढल्यामुळे टाेमॅटाेची चक्क नेपाळच्या सीमेवरून तस्करी हाेत असल्याचे उघडकीस आले आहे. एवढेच नव्हे तर परदेशातून येताना महागड्या वस्तूंऐवजी लाेक आपल्या नातेवाइकांना टाेमॅटाे घेऊन या, असे सांगत आहेत.
परदेशातून साेने, ड्रग्स, घड्याळे इत्यादींची तस्करी नेहमी हाेते. आता टाेमॅटाेची तस्करी व्हायला लागली आहे. तस्करांनी नेपाळची सीमा निवडली आहे. बिहार, युपी आणि उत्तराखंड या राज्यांतील नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या भागात चिनी टाेमॅटाेची तस्करी हाेत आहे.
सध्या नेपाळमध्ये चिनी टाेमॅटाेची अतिशय स्वस्तात विक्री हाेत आहे. तेथे ५ किलाे टाेमॅटाेसाठी १०० नेपाळी रुपये माेजावे लागतात. भारतीय रुपयामध्ये हा दर १२.३० रुपये प्रतिकिलाे एवढा हाेताे.
‘दुबईतून आणा १० किलाे टाेमॅटाे’
n दुबईत राहणाऱ्या एका अनिवासी महिलेला तिच्या नातेवाइकांनी भारतात येताना १० किलाे टाेमॅटाे आणायला सांगितले.
n तिच्या बहिणीने ट्वीट करून हा किस्सा सांगितला. येताना काय आणू, असे तिने आईला विचारले हाेते, तर आईने टाेमॅटाेचीच मागणी केली. हे ट्वीट व्हायरल झाले आहे.