चिराग पासवान NDAमध्ये सहभागी! अमित शाहांच्या भेटीनंतर निर्णय; जेपी नड्डांनीही केले स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 08:53 PM2023-07-17T20:53:13+5:302023-07-17T20:58:54+5:30

Chirag Paswan Joins NDA: एनडीएच्या बैठकीत चिराग पासवान हजेरी लावणार असल्याचे सांगितले जात आहे.

chirag paswan joins nda after meeting amit shah and bjp national president jp nadda | चिराग पासवान NDAमध्ये सहभागी! अमित शाहांच्या भेटीनंतर निर्णय; जेपी नड्डांनीही केले स्वागत

चिराग पासवान NDAमध्ये सहभागी! अमित शाहांच्या भेटीनंतर निर्णय; जेपी नड्डांनीही केले स्वागत

googlenewsNext

Chirag Paswan Joins NDA: २०२४ मध्ये होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. भाजपविरोधी पक्षांची एकजूट करण्याचे प्रयत्न सुरू असून, विरोधकांच्या खेळीला उत्तर देण्यासाठी आता एनडीएकडूनही एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता माजी केंद्रीय मंत्री दिवंगत रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान यांनी एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. चिराग पासवान यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांची भेट घेतली. अमित शाह यांच्यासह चिराग पासवान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनाही भेटले. 

लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) नेते चिराग पासवान यांनी अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्या भेटीनंतर एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. चिराग पासवान यांची दिल्लीत भेट झाली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. एनडीए परिवारात मी त्यांचे स्वागत करतो, असे ट्वीट जेपी नड्डा यांनी केले आहे. याशिवाय मंगळवारी होणाऱ्या एनडीएच्या बैठकीतही चिराग पासवान हजेरी लावणार असल्याचे सांगितले जात आहे. 

अमित शाह आणि चिराग पासवान यांच्यात १५ मिनिटे बैठक 

अमित शाह आणि चिराग पासवान यांच्यात सुमारे १५ मिनिटे बैठक झाली. या बैठकीनंतर लोजप (रामविलास)चे बिहारचे अध्यक्ष राजू तिवारी म्हणाले की, खूप चांगल्या वातावरणात सकारात्मक चर्चा झाली. विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. चिराग पासवान यांनी यापूर्वीच हाजीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे, अशी माहिती तिवारी यांनी सांगितले. पशुपती पारस यांच्या दाव्यावर ते म्हणाले की, कोण काय म्हणते? याच्याशी आमचा काहीही संबंध नाही, असे तिवारी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, एलजेपी (रामविलास)च्या सूत्रांनी सांगितले की, चिराग पासवान यांनी एनडीएमध्ये सहभागी होण्यापूर्वी बिहारमधील लोकसभा आणि विधानसभेच्या जागांबाबत भाजपशी स्पष्टतेचा आग्रह धरला आहे. जागावाटप निश्चित करण्यासाठी चिराग पासवान भाजपसोबत सातत्याने चर्चा करत आहेत. शाह यांच्यासोबतची भेटही याचाच एक भाग म्हणून पाहिली जात आहे. केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांनी यापूर्वी दोनदा चिराग पासवान यांची भेट घेतली.

 

Web Title: chirag paswan joins nda after meeting amit shah and bjp national president jp nadda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.