चित्तोडगड किल्ल्यातील फलक झाकला, पुरातत्त्व विभाग सावध; करणी सेनेच्या धमकीचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 01:39 AM2017-11-28T01:39:51+5:302017-11-28T01:40:11+5:30
‘पद्मावती’ चित्रपटावरुन सुरु झालेला वाद आता चित्तोडगढ किल्ल्यापर्यंत जाऊन धडकला आहे. करणी सेनेच्या धमकीनंतर पुरातत्व विभागाने येथील एक फलक लाल कपड्याने झाकून टाकला आहे.
जयपूर : ‘पद्मावती’ चित्रपटावरुन सुरु झालेला वाद आता चित्तोडगढ किल्ल्यापर्यंत जाऊन धडकला आहे. करणी सेनेच्या धमकीनंतर
पुरातत्व विभागाने येथील एक फलक लाल कपड्याने झाकून टाकला आहे. अलाउद्दीन खिलजीने पद्मावतीला याच ठिकाणी पाहिल्याचा उल्लेख या फलकात करण्यात आला आहे.
पुरातत्व विभागाच्या (एएसआय) फलकात लिहिले आहे की, पद्मिनी महल हीच ती जागा आहे, जिथे अलाउद्दिन खिलजीने राणी पद्मावतीची झलक पाहिली होती. करणी सेनेने या फलकावर आक्षेप घेत तो हटविण्याची मागणी केली होती. करणी
सेनेच्या धमकीनंतर आता हा फलक कपड्याने झाकण्यात आला आहे. (वृत्तसंस्था)
पद्मिनी महल आणि आरसे...
पद्मिनी महलमध्ये आरसे असून याच आरशाच्या माध्यमातून अलाउद्दिन खिलजीला राणी पद्मावतीची झलक पाहिल्याचे येथील गाइड सांगतात.
मात्र, राजपूत समुदायाने अशी मागणी केली आहे की, या आरशाशी संबंधित सर्व पुस्तके, फलक आणि इतर साहित्यातील माहिती हटविण्यात यावी. कारण यातून चुकीचा इतिहास मांडण्यात आलेला आहे. तर, करणी सेनेने काही महिन्यांपूर्वी चित्तोडगढ महलातील काही आरसे फोडले होते.