दत्तक मुलांची निवड बंद; एकच मूल देऊ करणार

By admin | Published: May 1, 2017 04:55 AM2017-05-01T04:55:21+5:302017-05-01T04:55:21+5:30

मूल दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांना यापुढे दत्तक घ्यायच्या मुलाची निवड करता येणार नाही. दत्तक प्रक्रियेचे समन्वय करणाऱ्या केंद्र सरकारच्या

The choice of adoptions is closed; Only one child will offer | दत्तक मुलांची निवड बंद; एकच मूल देऊ करणार

दत्तक मुलांची निवड बंद; एकच मूल देऊ करणार

Next

नवी दिल्ली : मूल दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांना यापुढे दत्तक घ्यायच्या मुलाची निवड करता येणार नाही. दत्तक प्रक्रियेचे समन्वय करणाऱ्या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय संस्थेतर्फे प्रत्येक इच्छुकास फक्त एकच मूल दत्तक घेण्यासाठी देऊ केले जाईल व ते मूल स्वीकारणे किंवा नाकारणे एवढाच पर्याय इच्छुकास उपलब्ध असेल. हा नवा नियम रविवार १ मेपासून लागू होईल.
मूल दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांना  सरकारच्या दत्तकविषयक पोर्टवर नोंदणी करावी लागते. अशा नोंदणीकृत इच्छुक पालकांना आत्तापर्यंत दत्तक देण्यासाठी उपलब्ध असलेल्या तीन मुलांचा पर्याय दिसा जायचा व त्यापैकी एक मूल त्यांना निवडता येत असे. ही प्रथा १ मेपासून बंद होईल व पालकांना प्रत्येकी फक्त एकच मूल देऊ केले जाईल.
या नव्या नियमामागील भूमिका स्पष्ट करताना ‘चाईल्ड अ‍ॅडॉप्शन रीसोर्स अ‍ॅथॉरिटी’ (कारा)चे मुख्य कार्यकारी अधिकारी लेफ्ट. कर्नल दीपक कुमार म्हणाले की, आधीच्या पद्धतीत दत्तक देण्यासाठी उपलब्ध असलेली मुले प्रत्यक्ष दत्तक घेतली जायच्या आधी प्रदीर्घ काळ पालकांनी पसंत करण्याच्या चक्रात राहायची. त्यामुळे दत्तकाचे प्रमाण कमी होते. आता नव्या नियमानुसार जेवढी मुले दत्तक देण्यासाठी ‘अ‍ॅडॉप्शन पूल’मध्ये उपलब्ध असतील तेवढी मुले प्रत्येकी एक या प्रमाणात तेवढ्याच पालकांना देऊ केली जातील.
मागणी जास्त, मुले कमी
मागणी जास्त व मुले कमी हीसुद्धा ‘कारा’पुढील एक अडचण आहे. ताज्या माहितीनुसार दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या १५ हजार पालकांनी पोर्टलवर नोंदणी केली आहे व त्यांना देऊ करण्यासाठी ‘अ‍ॅडॉप्शन पूल’मध्ये १८०० ते २००० एवढीच मुले उपलब्ध आहेत.
नियम निसर्गाशी सुसंगत
दाम्पत्यास निसर्गधर्मानुसार जेव्हा स्वत:चे मूल होते तेव्हा त्यांना मूल असेच व्हावे असा पर्याय नसतो. नशिबाने पोटी जन्माला येणारे मूल कसेही असले तरी आई-वडिलांसाठी ते नापसंत कधीच नसते. त्यामुळे दत्तक घेतलेल्या मुलाचाही याच भावनेने स्वीकार करून सांभाळ केला जावा, या या नियमाचा उद्देशही योग्यच आहे.
 
दत्तक दिले जाणारे मूल ही जणू काही एखादी वस्तू आहे अशा प्रकारे पसंती, नापसंतीनुसार निवड करण्याच्या वृत्तीला आळा बसावा, हाही याचा उद्देश आहे.
प्रत्येक वेळी एक अशा प्रकारे प्रत्येक पालकांना तीन फेऱ्यांमध्ये मूल देऊ केले जाईल. प्रत्येक फेरीत देऊ केले जाणारे मूल वेगळे असेल.
पालकांनी यापैकी एकही मूल स्वीकारले नाही तर त्यांचे नाव प्रतिक्षायादीच्या शेवटी टाकले जाईल.
या तीन फेऱ्यांमध्ये दाखविलेल्या मुलांपैकी एखादे मूल निवडण्याची संधी त्यांना किमान ९० दिवसांनंतरच पुन्हा मिळू शकेल.

४८ तासांची मुदत
एखाद्या मुलाची ‘प्रोफाईल’ पाठविल्यापासून ते मूल हवे की नको याचा निर्णय घ्यायला इच्छुक पालकांना ४८ तासांची मुदत असेल. त्यांनी ते मूल घ्यायचे ठरविले तर पुढील औपचारिकता पूर्ण करून त्यानंतर औपचारिक दत्तक आदेश घेण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला जाईल.

Web Title: The choice of adoptions is closed; Only one child will offer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.