अंतिम फेरीसाठी परिवर्तन व अविरत थिएटर्स संघाची निवड मू. जे. महाविद्यालय : दारव्हेकर स्मृति अखिल भारतीय मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धा

By Admin | Published: February 8, 2016 10:55 PM2016-02-08T22:55:19+5:302016-02-08T22:55:19+5:30

जळगाव : रंगगंध कलासक्त न्यास चाळीसगावच्यावतीने पूज्य पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृति अखिल भारतीय मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धेची प्राथमिक फेरी सोमवारी मू. जे. महाविद्यालयात झाली. या स्पर्धेतून अंतिम फेरीसाठी परिवर्तन जळगाव (उंटमार्‍या देशमुखाची कथा) व अविरत थिएटर्स (द्रोण) या संघाची निवड झाली आहे.

Choosing the Transition and Non-stop Theater Team for the final round J. College: Darvekar Smriti Akhil Bharatiya Marathi Literary Literature Competition | अंतिम फेरीसाठी परिवर्तन व अविरत थिएटर्स संघाची निवड मू. जे. महाविद्यालय : दारव्हेकर स्मृति अखिल भारतीय मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धा

अंतिम फेरीसाठी परिवर्तन व अविरत थिएटर्स संघाची निवड मू. जे. महाविद्यालय : दारव्हेकर स्मृति अखिल भारतीय मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धा

googlenewsNext
गाव : रंगगंध कलासक्त न्यास चाळीसगावच्यावतीने पूज्य पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृति अखिल भारतीय मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धेची प्राथमिक फेरी सोमवारी मू. जे. महाविद्यालयात झाली. या स्पर्धेतून अंतिम फेरीसाठी परिवर्तन जळगाव (उंटमार्‍या देशमुखाची कथा) व अविरत थिएटर्स (द्रोण) या संघाची निवड झाली आहे.

स्पर्धेचे उद्घाटन मू. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय कुळकर्णी यांच्या हस्ते यावेळी उपप्राचार्य प्रा. एन. व्ही. भारंबे, डॉ. सुरेश तायडे, प्रा. हेमंत पाटील, प्रा. गणेश सूर्यवंशी उपस्थित होते. प्रास्तावित प्रा. चारूता गोखले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. योगेश महाले यांनी मानले.
आनंद अलौकिक
प्राचार्य डॉ. कुळकर्णी म्हणाले, की स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांनी मनापासून साहित्यातील नाट्य, कविता, कथा यांचे वाचन केले, तर त्याचा आनंद अलौकिक असेल.
५० मिनीटात उत्कृ ष्ट सादरीकरण
मू. जे. महाविद्यालयातील दोन संघ (रंग आणि गंध या पुस्तकातील स्त्री विरुद्ध पुरुष हा लेख), परिवर्तन जळगावचे तीन संघ (सो कूल या सोनाली कुळकर्णी यांच्या लेखमालेचे वाचन, हिंदू कादंबरीतील उंटमार्‍या देशमुखाची गोेष्ट व अरुण कोलटकर यांची कविता याचे अभिवाचन) व गंधार कला मंडळाचा संघ (प्रशांत दळवींचा चारचौघी नाटकातील अंश), सृजन साहित्य संघ (पावसावरील कवितांचे अभिवाचन) व आय.एम.आर. महाविद्यालयाचा संघ असे एकूण नऊ संघ सहभागी झाले होते. परीक्षक म्हणून सुरेश बोरसे (अमरावती) व प्रा. राजेंद्र देशमुख (जळगाव) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
वाचिक अभिनयासाठी पारितोषिक प्राप्त स्पर्धकांची नावे
मंजुषा भिडे, रश्मी कुरंभ˜ी, हर्षल पाटील, वर्षा उपाध्ये, सपना काबरा

Web Title: Choosing the Transition and Non-stop Theater Team for the final round J. College: Darvekar Smriti Akhil Bharatiya Marathi Literary Literature Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.