महिलांचे मोबाईलमध्ये फोटो काढणार्‍यास चोप

By admin | Published: December 25, 2016 10:31 PM2016-12-25T22:31:30+5:302016-12-25T22:31:30+5:30

जळगाव : शहरातील प्रसिध्द मार्केट फुले मार्केट येथे एक इसम त्याच्या मोबाईलमध्ये खरेदी करत असलेल्या विविध दुकानांवरील महिलांचे फोटो काढत होता़ महिलांच्या तक्रारीवरून सदर इसमाला येथील विक्रेत्यांनी चोप देत शहर पोलिसांच्या स्वाधीन केले़ सदर इसम हा एका बँकेचा कर्मचारी असून यापूर्वीही सात ते आठ महिन्यांपूर्वी घडलेल्या अशाच प्रकारच्या घटनेत त्याला नागरिकांनी चोप दिल्याची माहिती मिळाली़ सदर इसमाच्या मुलाशी शहर पोलिसांनी संपर्क साधला व त्याला समज देवून सोडून दिले़ या घटनेची मार्केटमध्ये एकच चर्चा होती़ शहर पोलीस ठाण्यात विक्रेत्यांसह सदर इसमाला बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती़

Chop photos of women in mobile phones | महिलांचे मोबाईलमध्ये फोटो काढणार्‍यास चोप

महिलांचे मोबाईलमध्ये फोटो काढणार्‍यास चोप

Next
गाव : शहरातील प्रसिध्द मार्केट फुले मार्केट येथे एक इसम त्याच्या मोबाईलमध्ये खरेदी करत असलेल्या विविध दुकानांवरील महिलांचे फोटो काढत होता़ महिलांच्या तक्रारीवरून सदर इसमाला येथील विक्रेत्यांनी चोप देत शहर पोलिसांच्या स्वाधीन केले़ सदर इसम हा एका बँकेचा कर्मचारी असून यापूर्वीही सात ते आठ महिन्यांपूर्वी घडलेल्या अशाच प्रकारच्या घटनेत त्याला नागरिकांनी चोप दिल्याची माहिती मिळाली़ सदर इसमाच्या मुलाशी शहर पोलिसांनी संपर्क साधला व त्याला समज देवून सोडून दिले़ या घटनेची मार्केटमध्ये एकच चर्चा होती़ शहर पोलीस ठाण्यात विक्रेत्यांसह सदर इसमाला बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती़
कासोदा येथील खून खटला : संशयिताला वाढीव कोठडी
जळगाव : एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील नाजीम निजाम शेख (२१) याचा निर्दयीपणे खून करून त्याचा मृतदेह अंजनी धरणाच्या पाटचारीलगत आढळून आल्याची घटना २२ जुलै २०१६ रोजी उघडकीस आली होती़ याप्रकरणी पोलिसांनी धनराज उर्फ भैय्या भिमराव राक्षे (३३) रा़ फरकांडे चौफुलीजवळ, कासोदा २१ डिसेंबर २०१६ रोजी अटक केली होती़ त्याला न्यायालयात हजर केले असता २४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती़ कोठडीची मुदत संपल्याने त्याला शनिवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले़ न्या़व्ही़एचख़ेडकर यांनी त्याला २६ पर्यंत वाढीव कोठडी सुनावली़ आरोपीतर्फे ॲड़अविनाश़ के ़ पाटील तर सरकारपक्षातर्फे अविनाश़एस़पाटील यांनी काम पाहिले़

Web Title: Chop photos of women in mobile phones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.