चोपडा यांच्या शोधनिबंधाची जागतिक पातळीवर दखल
By admin | Published: April 25, 2015 02:10 AM2015-04-25T02:10:33+5:302015-04-25T02:10:33+5:30
आधुनिक शस्त्रक्रिया : दक्षिण कोरियातील तज्ज्ञांच्या संमेलनाचे आमंत्रण
Next
आ ुनिक शस्त्रक्रिया : दक्षिण कोरियातील तज्ज्ञांच्या संमेलनाचे आमंत्रणनाशिक : येथील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मनोज चोपडा यांनी लहान मुलांवर केलेल्या आधुनिक शस्त्रक्रियेवर आधारित शोधनिबंधाची दक्षिण कोरियात होणार्या अमेरिकन कार्डिओलॉजिस्टच्या मेळाव्यात सादरीकरणासाठी निवड झाली असून, येत्या २७ एप्रिल रोजी त्या शोधनिबंधाचे सादरीकरण होणार आहे.लहान मुलांच्या हृदयात असलेले छिद्र बंद करताना वापरलेल्या आधुनिक पद्धतीवर हा शोधनिबंध तयार करण्यात आला असून, त्यासाठी डॉ. चोपडा यांनी ७८ मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. याप्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी वापरल्या जाणार्या पद्धतीतही डॉ. चोपडा यांनी बदल केला असून, त्यांनी वेगळ्या प्रकारची छत्री वापरून हृदयात असलेले छिद्र बुजवले. या आधुनिक पद्धतीमुळे शस्त्रक्रियेनंतरही रुग्णांना कोणताही त्रास झाला नसल्याचा दावा डॉ. चोपडा यांनी केला आहे. छत्री बसवल्यानंतर रुग्णांना होणार्या त्रासाचे प्रमाण त्यामुळे कमी झाले. केवळ एक दिवसातच रुग्ण चालण्यास सक्षम झाला आणि तीन दिवसात त्याच्या घरी जाऊ दिले गेले. अशा एकूण ७८ लहान मुलांच्या हृदयावर याप्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया करताना जांघेतून शुद्ध रक्तवाहिणीतून शुद्ध महाधमनी आणि डावी जवनिका व नंतर उजवी जवनिका असा प्रवास त्या छत्रीचा करण्यात आला. या शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात आलेली छत्रीही वेगळ्या पद्धतीची वापरली गेली. रुग्णाच्या वयानुसार त्या छत्रीचा आकार ठरविण्यात आला. या संशोधनावर आधारित शोधनिबंध अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीमध्ये प्रकाशित होणार आहे. या शोधनिबंधाला गौरविण्यात आले असून, त्याच्याच सादरीकरणासाठी दक्षिण कोरिया येथे होणार्या संमेलनात डॉ. चोपडा यांना निमंत्रित करण्यात आले आहे. (सदर बातमी श्री. वायकोस साहेबांशी बोलून मग प्रसिद्ध करणे.)