अगुस्ता वेस्टलँडने ख्रिश्चन मायकलला मोजले ३३० कोटी
By admin | Published: April 27, 2016 12:43 PM2016-04-27T12:43:50+5:302016-04-27T12:46:50+5:30
व्हीव्हीआयपींसाठी अगुस्ता वेस्टलँड कंपनीकडून खरेदी केलेल्या हॅलिकॉप्टर व्यवहारातील आणखी एका धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - व्हीव्हीआयपींसाठी अगुस्ता वेस्टलँड कंपनीकडून खरेदी केलेल्या हॅलिकॉप्टर व्यवहारातील आणखी एका धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारताबरोबर हा व्यवहार करताना अगुस्ता वेस्टलँडने ख्रिश्चन मायकल या ब्रिटीश उद्योगपतीला ४४ मिलियन युरोज म्हणजे ३३० कोटी रुपये दिले.
कंपनीसाठी कामाचा मोबदला म्हणून मायकलला हे पैसे दिले पण हा संपूर्ण व्यवहार बेहिशोबी असल्याचे मिलानच्या न्यायालयाने म्हटले आहे. भारतही मायलकच्या शोधात असून, भारताच्या विनंतीवरुन इंटरपोलने डिसेंबर २०१५ मध्ये त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे.
भारताने अगुस्ताची हॅलिकॉप्टर विकत घ्यावीत यासाठी मायकल आणि ग्युआयडो हाशके या दोघांनी भारतीय अधिका-यांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न असे इटालियन सरकारने म्हटले आहे. अगुस्ताने केलेल्या विक्री व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचे मिलानच्या न्यायालयाने म्हटले असून, आपल्या निकालात मायकलचा विशेष उल्लेख केला आहे.