अहमदाबादमध्ये नाताळनिमित्त तयार करण्यात आला 750 किलोंचा केक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 09:41 AM2018-12-25T09:41:58+5:302018-12-25T09:45:30+5:30
गुजरातच्या अहमदाबादमध्ये नाताळनिमित्त 750 किलो वजनाचा प्लम केक खास नाताळनिमित्त तयार करण्यात आला आहे. अहमदाबाद येथील एका मॉलमध्ये हा केक आणला गेला होता. 750 किलोचा केक पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.
नवी दिल्ली - नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी देश सज्ज झाला आहे. नाताळमुळे देशभरात ख्रिस्ती बांधवांसह सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये नाताळनिमित्त 750 किलो वजनाचा प्लम केक खास नाताळनिमित्त तयार करण्यात आला आहे. अहमदाबाद येथील एका मॉलमध्ये हा केक आणला गेला होता. 750 किलोचा केक पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.
नाताळनिमित्त सिक्रेट सँटा हा खेळ अनेक ठिकाणी खेळला जातो. याच खेळात हा केक तयार करून आणण्यात आला होता. केकवर मोठ्या अक्षरात सिक्रेट सँटा असे लिहिण्यात आले होते. तसेच या केकवर सांताक्लॉज आणि आइसमन यांचीही चित्रे रेखाटण्यात आली आहेत. सोशल मीडियावरही ख्रिसमसची धूम पाहायला मिळत आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुकवरून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.
Gujarat: A #Christmas plum cake weighing 750 kgs was unveiled at a mall in Ahmedabad earlier today. pic.twitter.com/PAVRS4wkPV
— ANI (@ANI) December 24, 2018