जीर्ण वीज तारा उठल्या जीवावर भोकर : ७५ टक्के नागरिक शिधापत्रिकेपासून वंचीत, आरोग्य केंद्र बेवारस
By admin | Published: May 13, 2016 10:35 PM2016-05-13T22:35:36+5:302016-05-13T22:35:36+5:30
जळगाव- चार दशकांपूर्वी भोकर येथे टाकलेल्या वीजतारा बदलण्याची तसदी वीज कंपनी घेत नसल्याने त्या जीर्ण होऊन वारंवार तुटत आहे. त्यामुळे वीजवाहक तार अंगावर पडून कोणाचा जीव जाण्याची वाट कंपनी पाहत आहे का? असा सवाल भोकर येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. शिवाय ७५ टक्के नागरिकांना शिधापत्रिका मिळाल्या नसल्याचीही तक्रार आहे.
Next
ज गाव- चार दशकांपूर्वी भोकर येथे टाकलेल्या वीजतारा बदलण्याची तसदी वीज कंपनी घेत नसल्याने त्या जीर्ण होऊन वारंवार तुटत आहे. त्यामुळे वीजवाहक तार अंगावर पडून कोणाचा जीव जाण्याची वाट कंपनी पाहत आहे का? असा सवाल भोकर येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. शिवाय ७५ टक्के नागरिकांना शिधापत्रिका मिळाल्या नसल्याचीही तक्रार आहे. वीज तारांना जागोजागी जोड; गावाबाहेरुन रस्ता करण्याची मागणी....भोकर येथे वीज पुरवठ्यासाठी १९७६ मध्ये वीज वाहक तारा जोडण्यात आल्या. याला आता ४० वर्षे उलटले तरी त्या बदलल्या गेलेल्या नाही. शिवाय त्या वेळचा दाब व आताचा दाब कितीतरी पटीने वाढून तो या वीज तारांना सोसवत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे दाब वाढण्यासह त्या जीर्ण झाल्याने वारंवार तुटून पडत आहे. साधारण दोन दिवसातून एकदा तर कधीकधी सकाळ-संध्याकाळ अशा दोन्ही वेळेस या तारा तुटून लोंबकळतात, असे येथील नागरिकांनी सांगितले. या वीजतारा इतक्या खाली आल्या आहेत की, अनेक ठिकाणी हात वर केला की, सहज या तारांचा स्पर्श होऊ शकतो. त्यामुळे हा प्रकार जीवावर बेतणारा आहे. वीज तार केव्हा तुटून पडेल हे सांगता येत नाही, त्यामुळे भर उन्हाळ्यात उकाडा होत असला तरी नागरिक रात्री बाहेर झोपण्यास धजावत नसल्याचेही सांगण्यात आले. या जीर्ण वीजतारा बदलण्याविषयी ग्रामसभेचा ठराव करुन तो पाठविण्यातदेखील आला. त्या बदलण्याचे केवळ आश्वासन मिळाले आहे. या गावातून तीर्थक्षेत्र रामेश्वर व परसोद येथे जाणारा रस्ता आहे. या ठिकाणी बाहेर गावचे नागरिक मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे सर्व वाहने गावातूनच जातात. यासाठी गावाबाहेरुन रस्ता करण्याचीही मागणी आहे. भर पुरातून नागरिकांचा प्रवास...गावाशेजारुन वाहणार्या तापी नदीवर पूल करण्याची जुनी मागणी आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. पावसाळ्यात चोपडा अथवा जळगावला जायचे झाल्यास नदीला पूर आला असतानाही त्या भर पुरातून नावेतून प्रवास करावा लागतो. कधी काय दुर्घटना होईल सांगता येत नाही. त्यामुळे तापी नदीवर पूल बांधण्यात यावा अशी, येथील नागरिकांनी मागणी केली आहे.