चर्चच्या रहस्यमय आगीचे संसदेत पडसाद

By Admin | Published: December 3, 2014 01:14 AM2014-12-03T01:14:28+5:302014-12-03T01:15:45+5:30

राजधानी दिल्लीतील एका चर्चला सोमवारी लागलेल्या आगीच्या घटनेवर मंगळवारी संसदेत विविध पक्षांच्या सदस्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.

Church's mysterious fire comes down in Parliament | चर्चच्या रहस्यमय आगीचे संसदेत पडसाद

चर्चच्या रहस्यमय आगीचे संसदेत पडसाद

googlenewsNext

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील एका चर्चला सोमवारी लागलेल्या आगीच्या घटनेवर मंगळवारी संसदेत विविध पक्षांच्या सदस्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. या आगीची चौकशी व्हावी, अशी मागणी सदस्यांनी केल्यानंतर चौकशी करून केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह याबाबत सभागृहात निवेदन सादर करतील, असे आश्वासन सरकारतर्फे देण्यात आले.
लोकसभेत शून्यप्रहरात माकपचे पी. करुणाकरन यांनी हा मुद्दा उपस्थित केला. सोमवारी सकाळी एका चर्चला आग लागली; परंतु पोलीस सायंकाळी घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत संपूर्ण इमारत जळाली होती, असा आरोप त्यांनी केला. हा केवळ अपघात नव्हता, तर घातपात होता आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या हेतूने हे कृत्य करण्यात आले, असा त्यांचा दावा होता. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी करुणाकरन यांना साथ देत या प्रकरणाची सर्वंकष चौकशी करून सरकारने सभागृहात निवेदन देण्याची मागणी केली. आगीच्या घटनेनंतर अनेक खासदारांनी घटनास्थळी भेट देऊन तेथील लोकांशी चर्चा केली होती. राज्यसभेत एका केंद्रीय मंत्र्याच्या वक्तव्यावर गदारोळ सुरू असताना संयुक्त जनता दलाचे शरद यादव यांनी हा मुद्दा मांडला. राजधानी दिल्लीत गेल्या १०० वर्षांच्या इतिहासात कुठल्याही चर्चला आग लागण्याचा प्रकार कधी घडला नाही, याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. देशातील धार्मिक हिंसाचाराच्या वाढत्या घटना लोकशाहीला घातक असल्याचे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Church's mysterious fire comes down in Parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.