धक्कादायक! लग्नाच्या जेवणातून विषबाधा; 45 चिमुकल्यांसह 100 लोक आजारी; काहींची प्रकृती गंभीर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 11:39 AM2021-09-02T11:39:33+5:302021-09-02T11:44:10+5:30

Food poisoning at wedding ceremony more than 100 people including 45 children sick : लग्नाच्या जेवणातून तब्बल 100 लोकांना विषबाधा झाल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे.

churu food poisoning at wedding ceremony more than 100 people including 45 children sick | धक्कादायक! लग्नाच्या जेवणातून विषबाधा; 45 चिमुकल्यांसह 100 लोक आजारी; काहींची प्रकृती गंभीर 

धक्कादायक! लग्नाच्या जेवणातून विषबाधा; 45 चिमुकल्यांसह 100 लोक आजारी; काहींची प्रकृती गंभीर 

Next

नवी दिल्ली - राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका लग्नाच्या जेवणातून तब्बल 100 लोकांना विषबाधा (Food poisoning) झाल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. यामध्ये 45 चिमुकल्यांचा देखील समावेश आहे. तसेच आजारी लोकांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. लग्नात आलेल्या पाहुणे मंडळींसह मुलीच्या कुटुंबातील लोक देखील विषबाधा झाल्यामुळे आजारी पडले. लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत अनेकांना विषबाधा झाली. उपचारासाठी लोकांना शहरातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सरदारशहरमध्ये कालू कुचामणिया यांच्या चार मुलींचं एकाच दिवशी लग्न होतं. दोन नवरदेव बीदासर, एक नवरदेव लाडनू आणि एक जोधपुरहून आपल्या नातेवाईकांना घेऊन सरदारशहर येथे आले होते. बुधवारी संध्याकाळपर्यंत लग्न आणि जेवणाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर वऱ्हाड निघून गेलं आणि अनेकांना पोटदुखी, उलटी आणि जुलाब असा त्रास सुरू झाला. त्यानंतर सर्वांना मिळेल त्या वाहनाने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 

रुग्णालयात रात्रभर एकामागे एक रुग्णांना दाखल करण्यात येत होतं. यामध्ये लहान मुलं, वृद्ध, महिला आणि पुरुष सर्वांचा समावेश होता. एकाचवेळी रुग्णांची संख्या वाढल्याने रुग्णालयात बेड कमी पडले. तर आरोग्य अधिकाऱ्यांवर रुग्णांना अगदी जमिनीवर झोपवून उपचार करण्याची वेळ आली. काही रुग्ण गंभीर होते त्यांना खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान वऱ्हाडातील अनेकांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र ते लोक आपापल्या गावी निघून गेल्याने त्यांच्यावर तिथे उपचार करण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 बापरे! कोरोना लसीसाठी चेंगराचेंगरी, लसीकरण केंद्रावर धक्काबुक्की, हाणामारी; 25 जण जखमी

देशात वेगाने लसीकरण सुरू आहे. अनेक ठिकाणी लसीकरणासाठी गर्दी होत असलेली पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी लसीचा तुटवडा देखील निर्माण झाला आहे. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालमध्ये लसीकरणासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 25 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यामध्ये शेकडो नागरिकांनी लसीकरण केंद्रात घुसण्याचा प्रयत्न केला. यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अनेक जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, लसीसाठी झालेल्या या चेंगराचेंगरीत सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. धूपगुडी आरोग्य केंद्राचा मुख्य दरवाजा उघडताच बाहेर जमलेल्या लोकांनी एकमेकांना धक्काबुक्की करत आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. 

Web Title: churu food poisoning at wedding ceremony more than 100 people including 45 children sick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.