हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 18:02 IST2024-11-17T18:02:22+5:302024-11-17T18:02:47+5:30
घरामध्ये लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. याच दरम्यान एक वाईट बातमी आली आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला

हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
राजस्थानमधील चुरू येथे एक भीषण अपघात झाला आहे. घरामध्ये लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. याच दरम्यान एक वाईट बातमी आली आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला. हमीरवास येथील २६ वर्षीय दयाप्त हा आपल्या मावशीच्या मुलाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी मावशीच्या घरी जात होता, मात्र त्याआधीच रस्त्यात त्याचा अपघात झाला. या घटनेने कुटुंबीयांचा आनंद हिरावून घेतला.
दयाप्त यांचं अवघ्या सात महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला खूप मोठा धक्का बसला आहे. ठिमोलीचे सरपंच संजय प्रजापत यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठिमोली येथील रहिवासी असलेले खेमचंद हे सौदी अरेबियाहून आले होते आणि रामपुरा येथील भाच्याच्या लग्नात सहभागी होण्यासाठी बसने थेट चुरूला उतरले होते.
हमीरवास येथील रहिवासी असलेला दयाप्त हा आपल्या मावशीच्या मुलाच्या लग्नासाठी आपल्या पत्नीसह रामपुरा गावात आला होता. तो नंतर आपल्या मामाला आणायला बाईक घेऊन आला होता. त्याच दरम्यान भरधाव वेगात आलेल्या एका वाहनाने पाठीमागून बाईकला धडक दिली आणि अपघातात 38 वर्षीय खेमचंद आणि त्यांचा 26 वर्षीय भाचा दयाप्त जखमी झाले.
जखमींना रुग्णवाहिकेच्या साहाय्याने रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्षात आणण्यात आले, तेथे उपचारादरम्यान दयाप्त याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे अधिकारीही दाखल झाले व त्यांनी अपघाताची माहिती घेतली. ते या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी एप्रिल महिन्यात हमीरवास रहिवासी दयाप्त याचं लग्न झालं होतं, त्याने प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर दोघेही पती-पत्नी चुरू येथे भाड्याच्या घरात राहत होते आणि दयाप्त चुरू येथील एका रिटेल मार्केटमध्ये काम करत होते. नवरा-बायको दोघेही हसत-खेळत आयुष्य जगत होते, पण त्यांच्या आयुष्यात आता धक्कादायक घटना घडली आहे.