कडक सॅल्यूट! आई-वडील अशिक्षित पण मुलांना शिकवलं, सक्षम केलं; 4 पैकी एक IAS, 3 अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 12:10 PM2023-05-29T12:10:35+5:302023-05-29T12:23:51+5:30
आई-वडिलांची धडपड पाहून मुलांनी मेहनत घेतली आणि अखेर पालकांच्या कष्टाचं सोनं केलं, आज त्यांच्या यशाची चर्चा सर्वत्र होत आहे.
जीवनात कठोर संघर्ष करूनच यश मिळवता येते. कठीण परिस्थितीत महत्त्वाचे निर्णय घेऊनच यश मिळू शकते. संघर्षाचे युग संपले की यशाचे पर्व सुरू होते. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. जी समजल्यावर फिल्मी वाटेल पण ती खरी आहे. खरं तर आई-वडिलांची धडपड पाहून मुलांनी मेहनत घेतली आणि अखेर पालकांच्या कष्टाचं सोनं केलं, आज त्यांच्या यशाची चर्चा सर्वत्र होत आहे.
प्राचार्य श्रवण कुमार सैनी, ज्यांच्या पालकांनी शाळा कधीच पाहिली नसेल, पण आपल्या चार मुलांना इतकं शिकवलं की एक मुलगा आयएएस आहे आणि तीन मुलं मोठ्या पदांवर आहेत. श्रवण कुमार सैनी सांगतात की, त्यांचे वडील छोटे शेतकरी होते आणि आई-वडील दोघेही कधीच शाळेत गेले नाहीत, पण त्यांनी आम्हा सर्व भावांना अभ्यासाची इतकी प्रेरणा दिली की आज सर्वजण यशस्वी टप्प्यावर आहेत.
श्रवण कुमार सैनी यांनी सांगितले की 7 भाऊ आणि बहिणी होत्या. वडील करत असलेल्या शेतीवर संपूर्ण कुटुंब अवलंबून होतं. अशा परिस्थितीत चारही भाऊ वडिलांना मदत करण्यासाठी शेतात जायचे आणि शेतात गाई-म्हशी चरून घरी परतायचे आणि शाळेत जायचे. त्यांनी सांगितले की, वडिलांचा संघर्ष आणि आर्थिक परिस्थिती पाहून त्यांना वेदना होत होत्या आणि त्यासाठी त्यांनी खूप मेहनत केली, आज हे चारही भाऊ आपल्या आयुष्यात यशस्वी झाले आहेत.
चार भावांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण स्थानिक सरकारी शाळेत घेतले आणि चुरू येथील लोहिया कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षणही घेतले. याचा परिणाम असा झाला की थोरला भाऊ डॉ. नवरंग लाल सैनी IAS आणि धाकटा छगनलाल सैनी RTDC मध्ये मॅनेजर आणि तिसरा भाऊ जो या जगात नाही पण तो गोविंद सैनी देखील RTDC चे चेअरमन राहिले आणि लहाण असलेले श्रावण कुमार सैनी प्राचार्य आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.