मनसे नगरसेवक कोल्हेंची सीआयडी चौकशी

By admin | Published: November 19, 2015 12:09 AM2015-11-19T00:09:12+5:302015-11-19T00:09:12+5:30

जळगाव/नाशिक : रामानंदनगरचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्त्येप्रकरणी बुधवारी राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाच्या अधिकार्‍यांनी जळगावमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक ललित कोल्हे यांची तीन तास कसून चौकशी केली़ यापूर्वी प्रमुख वाळू ठेकेदार राजेश मिश्रा, तसेच रवींद्र चौधरी या दोघांची चौकशी करून जबाब घेण्यात आला आहे़ दरम्यान, नगरसेवक कोल्हे यांनी आई गंभीर असल्याचे कारण चौकशी अधिकार्‍यांना सांगितले आहे़

CID inquiry of MNS corporator Kolhanei | मनसे नगरसेवक कोल्हेंची सीआयडी चौकशी

मनसे नगरसेवक कोल्हेंची सीआयडी चौकशी

Next
गाव/नाशिक : रामानंदनगरचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्त्येप्रकरणी बुधवारी राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाच्या अधिकार्‍यांनी जळगावमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक ललित कोल्हे यांची तीन तास कसून चौकशी केली़ यापूर्वी प्रमुख वाळू ठेकेदार राजेश मिश्रा, तसेच रवींद्र चौधरी या दोघांची चौकशी करून जबाब घेण्यात आला आहे़ दरम्यान, नगरसेवक कोल्हे यांनी आई गंभीर असल्याचे कारण चौकशी अधिकार्‍यांना सांगितले आहे़
मनसे नगरसेवक कोल्हे सकाळी अकरा वाजेच्या सुमारास चौकशीसाठी सीआयडी कार्यालयात हजर होते़ सीआयडी अधिकार्‍यांनी सुमारे दोनशे ते अडीचशे वेगवेगळे प्रश्न विचारून कोल्हेंचा जबाब नोंदवून घेतला़ आत्महत्त्या प्रकरणातील संशयित सागर चौधरी, त्याचा वाळू व्यवसायातील भागीदार रवींद्र चौधरी हे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यासाठी गेले असताना पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी नगरसेवक ललित कोल्हे यांच्या मोबाइलवर फोन केला होता़
पोलीस निरीक्षक सादरे यांचे फोनवरील संभाषण रेकॉर्ड करून कोल्हे यांनी ते रेकॉडिंर्ग सागर व रवींद्र चौधरी यांना दिले होते़ सागर चौधरी याने हे संभाषण आपल्या वकिलामार्फत न्यायालयास अटकपूर्व जामीन अर्जाच्या वेळी सादर केले आहे़ सीआयडीचे अधीक्षक प्रदीप देशपांडे व पोलीस निरीक्षक के.डी़ पाटील यांनी कोल्हे याने सादरे यांचा रेकॉर्ड केलेला फोन, तसेच संबंधांबाबत तीन तास चौकशी केली़ या चौकशीनंतर कोल्हेंचा लेखी जबाब घेण्यात आला़
सीआयडी चौकशीसाठी नगरसेवक ललित कोल्हे हे आपल्या संपूर्ण लवाजम्यासह हजर होते़ आईची तब्येत गंभीर असल्याचे कारण सांगून चौकशी लवकर घेण्याची विनंती केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे़ दरम्यान, वाळू ठेकेदार रवींद्र चौधरी, प्रमुख ठेकेदार राजेश मिश्रा व मनसे नगरसेवक ललित कोल्हे यांची सीआयडी चौकशी व जबाब पूर्ण झाला असून, सीआयडीचे पथक शुक्रवारी (दि़ २०) जळगावला जाणार आहे़ यानंतर या चौकशीचा अहवाल पुणे येथे सीआयडीचे अपर महासंचालकांना सादर केला जाणार आहे़

Web Title: CID inquiry of MNS corporator Kolhanei

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.