सादरे आत्महत्येचा तपास सीआयडीकडे
By admin | Published: October 30, 2015 12:16 AM2015-10-30T00:16:30+5:302015-10-30T00:16:30+5:30
जळगाव: पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येचा तपास नाशिक पोलिसांकडून काढून तो सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करीत हा तपास सीआयडीकडे सोपविण्याची मागणी शिवसेना, आम आदमी पार्टी, कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने केली होती. त्याची दखल राज्य शासनाने घेतली आहे. याबाबत पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांना विचारले असता त्यांनी दुजोरा दिला आहे.
Next
ज गाव: पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येचा तपास नाशिक पोलिसांकडून काढून तो सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करीत हा तपास सीआयडीकडे सोपविण्याची मागणी शिवसेना, आम आदमी पार्टी, कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने केली होती. त्याची दखल राज्य शासनाने घेतली आहे. याबाबत पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांना विचारले असता त्यांनी दुजोरा दिला आहे.दोन स्तरावर चौकशीसादरे यांच्या आत्महत्येप्रकरणी दोन स्तरावर चौकशी सुरू होती. नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक जयजीत सिंग यांच्याकडे विभागीय चौकशी होती तर नाशिक आयुक्त एस.जगन्नाथन यांच्याकडे दाखल गुन्ाची चौकशी सुरु आहे. जयजीत सिंग यांच्याकडील विभागीय चौकशी पूर्ण झाली आहे. त्याचा अहवाल पोलीस महासंचालकांना सादर करण्यात आला आहे. आयुक्तालयातील सहायक आयुक्त विजयकुमार चव्हाण यांच्याकडील चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही.कोट..पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येचा तपास आजच सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे.-प्रवीण दीक्षित,पोलीस महासंचालक