सिडकोला मिळाले तिसर्यांदा सभापतिपद
By admin | Published: March 24, 2015 11:06 PM2015-03-24T23:06:34+5:302015-03-24T23:55:55+5:30
सिडको : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी शिवाजी चंुभळे यांची निवड झाल्याने सिडको भागाला तिसर्यांदा सभापतिपद मिळाले. यामुळे सिडको भागाचा विकास होण्याची अपेक्षा येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
सिडको : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी शिवाजी चंुभळे यांची निवड झाल्याने सिडको भागाला तिसर्यांदा सभापतिपद मिळाले. यामुळे सिडको भागाचा विकास होण्याची अपेक्षा येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
कामगार वर्ग म्हणून ओळखल्या जाणार्या व स्वतंत्र विधानसभा मतदार संघ असलेल्या सिडको भागाला राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवाजी चंुभळे यांच्या रुपाने तिसर्यांदा स्थायी समिती सभापतिपद मिळाले. या आधी राष्ट्रवादीचे नाना महाले व शिवसेनेचे मामा ठाकरे यांनी हे पद भूषविले आहे. शिवाजी चुंभळे हे सलग तिसर्यांदा नगरसेवक झाले असून, यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या सौभाग्यवती कल्पना चंुभळे यादेखील नगरसेवक आहेत. ऐन सिंहस्थाच्या काळात चुंभळे यांना स्थायीचे सभापतिपद मिळाल्याने सिडकोतील प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. सिडकोला महापौरपद मिळाले नसले, तरी महत्त्वाचे स्थायी समिती सभापतिपद मिळाल्याने सिडकोवासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
सिडकोतील सहावी योजना मनपाकडे हस्तांतरित करण्याचा महत्त्वाचा प्रश्न प्रलंबित आहे. याबरोबरच बंद पेलिकन पार्क, सिडकोसाठी स्वतंत्र थेट पाइपलाइन योजनेचे रखडलेले काम, राजे संभाजी क्रीडा संकुलाचे अपूर्ण अवस्थेतील काम यांसह येथील विकासाच्या योजना राबविणे अशी कामे मार्गी लावण्यासाठी व सिडकोचा विकास साधण्यासाठी शिवाजी चुंभळे यांनी पुढाकार घेण्याची अपेक्षा सिडकोवासीयांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, चंुभळे यांची स्थायी समिती सभापतिपदी निवड होताच त्यांच्या निवासस्थानी फटाक्यांची आतषबाजी करून व ढोलताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. (वार्ताहर)