सिगारेट कंपन्यांचा ‘उत्पादन बंदी’चा निर्णय
By Admin | Published: April 2, 2016 01:09 AM2016-04-02T01:09:54+5:302016-04-02T01:09:54+5:30
सिगारेट पॅकवर आरोग्यासंबंधी चित्रात्मक इशारा प्रसिद्ध करण्याच्या नवीन नियमाचा विरोध करण्य् ाासाठी आय.टी.सी., गोडफ्रे फिलिप्स आणि व्हीएसटी यासारख्या बड्या
नवी दिल्ली : सिगारेट पॅकवर आरोग्यासंबंधी चित्रात्मक इशारा प्रसिद्ध करण्याच्या नवीन नियमाचा विरोध करण्य्
ाासाठी आय.टी.सी., गोडफ्रे फिलिप्स आणि व्हीएसटी यासारख्या बड्या कंपन्यांनी शुक्रवारी एक अभूतपूर्व निर्णय घेऊन आपल्या कारखान्यातील सिगारेटचे उत्पादन त्वरित थांबविले. सिगारेट पॅकेवर ८५ टक्के हिश्श्यावर चित्रात्मक इशारा छापणे बंधनकारक आहे. हा नियम संशयास्पद असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. टोबॅको इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या सदस्य असलेल्या या कंपन्या सिगारेटवरील कराच्या स्वरूपात ९८ टक्क्यांपेक्षा जास्त योगदान करीत असतात. आपला व्यवसाय बंद करण्यात आल्याने दररोज ३५0 कोटी रुपयांचे नुकसान होईल, असा त्यांचा दावा आहे. टीआयआय ने एका निवेदनात म्हटले आहे की, तंबाखू उत्पादनांच्या पॅकेटवरील इशारा प्रसिद्ध करण्याचा नवीन नियम संशयास्पद असल्याने एप्रिल २0१६ पासून सिगारेटचे उत्पादन जारी ठेवणे अशक्य आहे.
संसदीय समितीचा विरोध
संसदीय समितीने केलेल्या शिफारशीकडे दुर्लक्ष करून केंद्र सरकारने मोठ्या चित्राद्वारे इशारा देणाऱ्या नियमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला होता.
हा निर्णय ‘अतिशय कठोर’ असल्याने इशारा देणाऱ्या चित्राचा आकार कमी करण्याची गरज असल्याचे तंबाखू उद्योगाचे म्हणणे आहे.