चार वर्षात सिगारेट दुप्पटीने महागले
By admin | Published: February 29, 2016 03:44 PM2016-02-29T15:44:51+5:302016-02-29T15:47:01+5:30
मागच्या चार वर्षात सिगारेटशी संबंधित विविध करांमध्ये ९८ टक्के वाढ झाली आहे. यावेळी आठ ते दहा टक्के करवाढ होईल असा तंबाखूउत्पादकांचा अंदाज होता.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - भारतात सलग पाचव्यावर्षी सिगारेटच्या किंमती वाढणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये सर्व तंबाखू उत्पादनांच्या उत्पादन शुल्क दरात १० ते १५ टक्के वाढ केली आहे. फक्त बिडीवरील उत्पादन शुल्कात कोणतीही वाढ केलेली नाही.
या निर्णयाचा देशातील सर्वात मोठी सिगारेट उत्पादक कंपनी आयटीसी लिमिटेडला फटका बसला आहे. तंबाखू उत्पादनांवरील उत्पादन शुल्क वाढीची घोषणा होताच शेअर बाजारातील आयटीसीच्या शेअर्समध्ये ३.१३ टक्क्यांनी घसरण झाली. मागच्या काही वर्षात सिगारेट कंपन्यांना दरवाढीची झळ सोसावी लागली आहे.
मागच्या चार वर्षात सिगारेटशी संबंधित विविध करांमध्ये ९८ टक्के वाढ झाली आहे. यावेळी आठ ते दहा टक्के करवाढ होईल असा तंबाखूउत्पादकांचा अंदाज होता. मागच्यावर्षीच्या बजेटमधील करवाढीमुळे सिगारेटच्या किंमतीत १५ ते २५ टक्के वाढ झाली होती. सिगारेटवरील करवाढ कमी व्हावी म्हणून सिगारेट कंपन्यांचे प्रयत्न सुरु होते. मात्र आरोग्य मंत्रालयाने सिगारेटवर करवाढीची शिफारस केली होती.