सिलिंडर 3 रुपयांनी महाग

By admin | Published: October 30, 2014 02:13 AM2014-10-30T02:13:33+5:302014-10-30T02:13:33+5:30

सरकारने स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडर विक्रेत्यांचे कमिशन वाढविल्यामुळे सबसिडीवर मिळणारे एलपीजी सिलिंडर तीन रुपयांनी महागले आहे.

Cilinder costlier by Rs 3 | सिलिंडर 3 रुपयांनी महाग

सिलिंडर 3 रुपयांनी महाग

Next
नवी दिल्ली : सरकारने स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडर विक्रेत्यांचे कमिशन वाढविल्यामुळे सबसिडीवर मिळणारे एलपीजी सिलिंडर तीन रुपयांनी महागले आहे.
14.2 किलोच्या प्रति सिलिंडरमागे कमिशन तीन रुपयांनी वाढवून 43 रुपये 71 पैसे करण्यात आले आहे. गेल्या आठवडय़ात घेतलेल्या या निर्णयाने स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची किंमतही वाढविण्यात आली असल्याची माहिती अधिका:यांनी दिली. यापूर्वी डिसेंबर 2क्13 मध्ये विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात आली होती. त्या वेळी प्रति सिलिंडर 3 रुपये 46 पैसे वाढ करून 4क् रुपये 71 पैसे एवढे कमिशन झाले होते. कमिशनचे नवे दर 23 ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत. त्यानुसार मुंबईत हे दर 452 रुपये असतील. यापूर्वी 448.5क् रुपये होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
विक्रेत्यांचे कमिशन वाढल्याने गैरसबसिडी गॅस सिलिंडरचे दर 8क्क् रुपयांवरून 883.5क् रुपये झाले आहेत. 

 

Web Title: Cilinder costlier by Rs 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.