सिनेमा परीक्षण- अंकात अवश्य - सेकंड हँड हसबंड - दुसर्या विवाहाच्या नावावर निरर्थक कथा
By admin | Published: July 3, 2015 11:00 PM2015-07-03T23:00:11+5:302015-07-03T23:00:11+5:30
रेटिंग - १ स्टार
Next
र टिंग - १ स्टार विवाहित जीवनाचे अनेक प्रश्न असतात, वेळीच ते सुटले नाहीत तर , घटस्फोटाची वेळ येते आणि घटस्फोट झाल्यानंतर येणारे एकाकीपण ही नवी समस्या समोर येते. या थीमवर बनविण्यात आलेल्या सेकंड हसबंड या चित्रपटाची कथा खरेतर चांगली होती, पण दिग्दर्शक व लेखक या जोडीला त्यातून उत्कृष्ट चित्रपट बनविता आला नाही. चंदीगड येथील अलीशान हॉटेलचा मालक अजीतसिंग ( धर्मेंद्र) , आपल्या पत्नी (रती अग्निहोत्री ) सह राहात असतो. पण दारू व दुसर्या महिलांसोबत असणार्या संबंधामुळे पती-पत्नीत तणाव निर्माण होतो. हा तणाव वाढत अखेर घटस्फोटापर्यंत पोहोचतो. अजीतच्या हॉटेलचा मॅनेजर राजबीर (जिप्पी गे्रवाल) आपल्याच आयुष्यातील समस्यामुळे त्रस्त आहे. राजबीरचा आपली पत्नी नेहा (गीता बसरा) शी घटस्फोट झाला आहे. पण न्यायालयाच्या निकालानुसार राजबीरला नेहाला पोटगीच्या नावर मोठी रक्कम द्यावी लागते. त्यामुळे तो मैत्रीण गुरप्रीत (टीना आहुजा) शी विवाह करु शकत नाही. पोलिस इन्स्पेक्टरला (विजयराज) नेहाचे आकर्षण आहे, पण तिला तो आवडत नाही. विजयराजची पत्नी मरण पावली असून तो दुसर्या पत्नीच्या शोधात आहे. नेहाला अजीत आवडतो, पण तो घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच आपल्या पत्नीकडे परत जातो. नेहाला हवा तसा जोडीदार मिळतो. राजबीर - गुरप्रीत यांचा मार्ग मोकळा होतो. चित्रपटाची कमजोर बाजू- दिग्दर्शक समीप कांग यांच्याकडे या कथानकातून एक चांगला चित्रपट बनविण्याची संधी व मसाला दोन्हीही होते. पण दिग्दर्शक म्हणून ते या कथानकाला न्याय देऊ शकले नाहीत. परिणामी चित्रपट ढिसाळ व नीरस झाला. पंजाबी स्टाईल चित्रपट बनविण्याच्या प्रयत्नात त्यानी सर्व अतीवापरामुळे गुळगुळीत झालेले मसाले वापरले. चित्रपटाची कथा कमजोर झाली व बाकी कसर कलाकारांनी भरुन काढली. चित्रपटाचे हिरो जिप्पी ग्रेवाल प्रभावहीन आहेत, गीता बसराकडून अभिनयाची अपेक्षा नव्हतीच , पण ग्लॅमरमध्येही ती फेल गेली. टीना आहुजा या नावाने चित्रपट क्षेत्रात प्रवेश करणार्या गोविंदाच्या मुलीने निराश केले. मुकेश तिवारीपासून संजय मिश्रा व रती अग्निहोत्री पासून विजयराजपर्यंत , आलोकनाथ, रवीकिशन या सर्वांचीच कामे बेताची झाली आहेत. पंजाबी स्टाईल गाणी भरपूर आहेत, पण दर्जा नाही. त्यामुळे दिग्दर्शक म्हणून समीप कांग फेल ठरले आहेत.