Jammu and Kashmir : नौगाममध्ये जवानांवर ग्रेनेड हल्ला, CISF अधिकारी शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 09:44 AM2018-10-27T09:44:21+5:302018-10-27T11:45:14+5:30
दहशतवाद्यांनी केलेल्या या ग्रेनेड हल्ल्यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा (सीआयएसएफ) अधिकारी शहीद झाला आहे.
श्रीनगर : श्रीनगरमधील वागुरा नौगाम सेक्टरमध्ये शुक्रवारी (26 ऑक्टोबर) रात्री दहशतवाद्यांनी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या अधिकाऱ्यांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या या ग्रेनेड हल्ल्यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा (सीआयएसएफ) अधिकारी शहीद झाला आहे.
Srinagar: Wreath laying ceremony of CISF ASI Rajesh Kumar who lost his life after terrorists lobbed a grenade on him when he was deployed for security of a power grid at Wagoora Nowgam in Srinagar, late last night. #JammuAndKashmirpic.twitter.com/vpzZS6DJUf
— ANI (@ANI) October 27, 2018
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सीआयएसएफ एएसआय राजेश कुमार यांना वागुरा नौगाम सेक्टरमध्ये पॉवर ग्रीडच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलं होतं. यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर ग्रेनेड हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यात राजेश कुमार शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांना कोणत्याही प्रकारे मदत मिळू नये, यासाठी जवानांकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची शक्यता असल्याने जवानांनी शोध मोहीम सुरू केली आहे.
Terrorists lobbed a grenade on a CISF ASI deployed for security of a power grid at Wagoora Nowgam in Srinagar, late last night. ASI Rajesh Kumar lost his life in the incident. Area cordoned off #JammuAndKashmirpic.twitter.com/DjezTZI6AC
— ANI (@ANI) October 27, 2018