फोनवर बोलता बोलता तरुण मेट्रो ट्रॅकवर पडला, CISF जवान ठरला देवदूत; असे वाचवले प्राण, पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 01:45 PM2022-02-05T13:45:39+5:302022-02-05T13:47:40+5:30
देशाची राजधानी दिल्लीमध्ये मेट्रोच्या ट्रॅकवर एक तरुण पडल्याच्या घटनेचं धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. हा व्हिडिओ शुक्रवारी रात्री ८ वाजून ४३ मिनिटांचा असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून येत आहे.
नवी दिल्ली-
देशाची राजधानी दिल्लीमध्येमेट्रोच्या ट्रॅकवर एक तरुण पडल्याच्या घटनेचं धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. हा व्हिडिओ शुक्रवारी रात्री ८ वाजून ४३ मिनिटांचा असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून येत आहे. प्रवासावेळी फोनवर बोलणं किती महागात पडू शकतं याचं उदाहरणच या घटनेतून समोर आलं आहे. समोरुन मेट्रो येत असतानाही फोनवर बोलण्याचा निष्काळजीपणा एका प्रवाशाच्या जीवावर बेतला असता. पण सीआयएसएफच्या जवानानं दाखवलेल्या शौर्यानं संबंधित प्रवाशाचे प्राण वाचले आहेत.
सीसीटीव्ही व्हिडिओ दिल्लीच्या शाहदरा मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मचा आहे. एक प्रवासी फोनवर बोलण्यात इतका गुंग होता की तो प्लॅटफॉर्मवर चालता चालता थेट मेट्रोच्या ट्रॅकवर कोसळला. तो इतक्या जोरात कोसळला की त्याला उठताही येत नव्हतं आणि समोरुन मेट्रो येत होती.
सीआयएसएफच्या क्यूआरटी पथकाची गस्त त्यावेळी विरुद्ध बाजूच्या प्लॅटफॉर्मवर सुरू होती. सीआयएसएफच्या पथकातील एका जवानानं संबंधित प्रवासी मेट्रो ट्रॅकवर पडल्याचं पाहिलं आणि त्यानं तातडीनं याची माहिती सहकारी जवानांना दिली.
Dilli Metro प्लेटफॉर्म..फोन पर बात करते हुए चल रहा था यात्री.. अचानक गिर पड़ा मेट्रो ट्रेन ट्रेक पर..अलर्ट CISF QRT ने बचाई जान... @ZeeNews@capt_ivane@CISFHQrs@OfficialDMRC@LtGovDelhipic.twitter.com/szLWUxhKYV
— Neeraj Gaur (@NeerajGaur_) February 5, 2022
सीआयएसएफ जवान रोहतास यांनी जीवाची पर्वा न करता मेट्रो ट्रॅकवर उडी घेतली आणि प्रवाशाला उचलून त्याला प्लॅटफॉर्मवर आणलं. रोहतास यांना पोहोचायला काही सेकंदांचा उशीर झाला असता तर मोठी दुर्घटना यावेळी घडली असती. सीआयएसएफ जवानानं दाखवलेल्या शौर्यामुळे प्रवासी शैलेंद्र मेहता याला जीवदान मिळालं आहे. या संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे. रोहतास यांनी दाखवलेल्या शौर्याचं कौतुक केलं जात आहे.