धक्कादायक! CISF जवानाने वॉशरूममध्ये स्वतःवर गोळी झाडून घेतली; दिल्लीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 12:59 PM2022-10-15T12:59:50+5:302022-10-15T13:00:09+5:30

दिल्ली येथील वेलकम मेट्रो स्टेशन येथील वॉशरुम मध्ये एका २२ वर्षीय सीआयएसएफ जवानाने सर्वीस रायफलने स्वत:वर गोळी झाडून घेतली.

CISF constable shoots himself inside metro station in Delhi | धक्कादायक! CISF जवानाने वॉशरूममध्ये स्वतःवर गोळी झाडून घेतली; दिल्लीतील घटना

धक्कादायक! CISF जवानाने वॉशरूममध्ये स्वतःवर गोळी झाडून घेतली; दिल्लीतील घटना

Next

नवी दिल्ली :दिल्ली येथील वेलकम मेट्रो स्टेशन येथील वॉशरुम मध्ये एका २२ वर्षीय सीआयएसएफ जवानाने सर्वीस रायफलने स्वत:वर गोळी झाडून घेतली. यात या जवानाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास वेलकम मेट्रो स्थानकाच्या वॉशरुममधून गोळीबाराचा आवाज येऊ लागला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. यावेळी वॉशरुममध्ये सीआयएसएफचा जवान एक जवान जखमी अवस्थेत सापडला. 

हिमाचलमध्ये निवडणुकीचे बिगुल; एकाच दिवशी सर्व जागांवर मतदान; गुजरातची घोषणा मात्र लांबणीवर

या जवानाकडून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. त्यामुळे घटनेचा खुलासा झालेला नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. हा जवान  बिहारमधील आहे. कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

मृत जवान हा बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील रहिवासी होता, २०२१ मध्ये सीआयएसएफमध्ये कॉन्स्टेबल पदावर भरती झाला होता. जवान वेलकम मेट्रो स्टेशनवर तैनात होता. गुरुवारी घटनेची माहिती मिळताच शास्त्री पार्क मेट्रो स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तपासादरम्यान कॉन्स्टेबलने बाथरूममध्ये सर्व्हिस एसएलआरने गोळी झाडून आत्महत्या केल्याचे पोलिसांना आढळून आले असून पुढील तपास सुरू आहे.

हा जवान पाच महिन्यांपूर्वी प्रशिक्षण घेऊन ड्युटीवर जॉईन झाला होता. डिसेंबर महिन्यात तिचे लग्न होणार होते. पोलिसांनी जवानाचे फोन डिटेल्स तपासल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

वॉशरूममधून गोळीबाराचा आवाज येताच तेथे उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ आत धाव घेतली तिथे जवान अजय रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. जवानाच्या कपाळावर गोळी लागली होती. कॉन्स्टेबल अजयला तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Web Title: CISF constable shoots himself inside metro station in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :delhiदिल्ली