कंगना राणौतला चापट मारणाऱ्या महिला CISF कॉन्स्टेबलसह तिच्या पतीची बदली...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 03:37 PM2024-07-03T15:37:11+5:302024-07-03T15:37:43+5:30

याप्रकरणी कंगनाने CISFच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची तक्रार केली होती.

CISF constable who slapped Kangana Ranaut has been transferred along with and her husband | कंगना राणौतला चापट मारणाऱ्या महिला CISF कॉन्स्टेबलसह तिच्या पतीची बदली...

कंगना राणौतला चापट मारणाऱ्या महिला CISF कॉन्स्टेबलसह तिच्या पतीची बदली...

Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री आणि निवनिर्वाचित भाजप खासदार कंगना राणौतला (Kangana Ranaut) चंदीगड विमानतळावर चापट मारणाऱ्या महिला CISF कॉन्स्टेबलची बदली करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुलविंदर कौरसह तिच्या पतीचीही बदली झाली आहे. दरम्यान, कंगनाला चापट मारल्याच्या घटनेनंतर कुलविंदर कौरला निलंबित करण्यात आले होते. आता तिची थेट बंगळुरू येथे बदली करण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
कंगना राणौत हिमाचल प्रदेशातील मंडी येथून लोकसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर दिल्लीला जाण्यासाठी तीन चंदीगड विमानतळावर आली. यावेळी सुरक्षा तपासणीदरम्यान महिला CISF कॉन्स्टेबलने तिच्या गालात चापट मारली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर कंगनाने दिल्ली गाठून सीआयएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची तक्रार केली होती.

कंगनाला का मारले?
या घटनेनंतर महिलेचाही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओत तिने चापट मारल्याचे कारण सांगितले होते. "कंगनाने शेतकरी आंदोलनात महिला प्रत्येकी 100 रुपये घेऊन आंदोलन करत असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावेळी माझी आई त्या आंदोलनात सहभागी झाली होती," असे त्या महिलेने म्हटले होते.
 

Web Title: CISF constable who slapped Kangana Ranaut has been transferred along with and her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.