अत्याचाराविरोधात CISF च्या 200 जवानांची उच्च न्यायालयात धाव

By admin | Published: April 3, 2017 11:59 AM2017-04-03T11:59:56+5:302017-04-03T11:59:56+5:30

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी (सीआयएसएफ) वारंवार आपल्याला होणारा त्रास, खराब जेवण, कठिण परिस्थितींमध्ये करावं लागणार काम, वेळेत पगार न मिळणे याची तक्रार केली आ

The CISF's 200 soldiers against the atrocities in the High Court | अत्याचाराविरोधात CISF च्या 200 जवानांची उच्च न्यायालयात धाव

अत्याचाराविरोधात CISF च्या 200 जवानांची उच्च न्यायालयात धाव

Next
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 3 - केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी (सीआयएसएफ) वारंवार आपल्याला होणारा त्रास, खराब जेवण, कठिण परिस्थितींमध्ये करावं लागणार काम, वेळेत पगार न मिळणे याची तक्रार केली आहे. खात्याअंतर्गत तक्रार करण्यापासून ते पंतप्रधानांना पत्र लिहिण्यापर्यंत सर्व काही प्रयत्न करत जवानांनी आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र आता बंगळुरुमधील कॅम्पे गौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या 200 जवानांनी आपल्यावर होणा-या अत्याचाराविरोधात आवाज उठवत कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. जवानांच्या तक्रारींवरुन केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाला कशा प्रकारच्या सुविधा मिळत असून, कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागत असल्याचं समोर आलं आहे. 
 
(केरळमध्ये CRPF च्या 400 जवानांना अन्नातून विषबाधा)
 
गृहमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या 3 वर्षात निमलष्करी दलाच्या 344 जवानांनी आत्महत्या केली आहे. यामधील 15 जवानांनी वर्षाच्या सुरुवातीच्या तीन महिन्यातच आत्महत्या केली आहे. आकडेवारीनुसार आत्महत्या करणा-या जवानांमधील 15 टक्के म्हणजे 53 जवान सीआयएसएफचे होते. याशिवाय 25 घटना अशा आहेत जिथे जवानांनी आपल्या सहका-याची हत्या केली किंवा त्याच्यावर गोळी झाडली. अशा घटनांमध्ये सामील असणा-या जवानांमधील 13 जवान सीआयएसएफचे होते. 
 
याचवर्षी जानेवारी महिन्यात कॅम्पे गौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका जवानाने आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. सीआयएसएफ आणि स्थानिक पोलिसांनी खासगी कारणांमुळे जवानाने आत्महत्या केल्याचं सांगितलं होतं. कॅम्पे गौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील असुविधांवर बोलताना एका सीआयएसएफ जवानाने सांगितलं की, "जेवणाचा दर्जा अत्यंत खराब आहे. आम्हाला शिफ्टदरम्यान एकही ब्रेक दिला जात नाही. आम्हाला घर तसंच वाहतूक भत्ताही मिळत नाही. वरिष्ठांकडून आम्हाला योग्य वागणूकही मिळत नाही. तसंच हवं तेव्हा आमचा पगार कापला जात असतो".
 

Web Title: The CISF's 200 soldiers against the atrocities in the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.